Ganesh Chaturthi sakal
Ganesh Chaturthi Festival

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकूनही या 5 गोष्टी करू नका, नाहीतर...

घरामध्ये गणपती बसवण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

Aishwarya Musale

गणेशोत्सवाला 19 तारखेपासून सुरुवात होत आहे. प्रत्येक पूजेपूर्वी गणेशाची आराधना अनिवार्य मानली जाते. गणपतीची पूजा केली नाही तर कोणतेही काम यशस्वीपणे पूर्ण होऊ शकत नाही, असे मानले जाते.

अडथळ्यांचा नाश करणाऱ्या श्रीगणेशाची उपासना केल्याने सुख-समृद्धी येते आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात, मात्र गणेश चतुर्थीच्या दिवशी काही विशेष नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. चला जाणून घेऊया कोणत्या चुका टाळाव्यात.

1. पावित्र्य जपा: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा करताना पावित्र्याकडे पूर्ण लक्ष द्या. सकाळी आंघोळ केल्यावर स्वच्छ धुतलेले कपडे घाला. न धुलेले कपडे घालू नका.

2. मंदिराची साफसफाई : पूजेपूर्वी तुमच्या घराचे मंदिर पूर्णपणे स्वच्छ करा, घर अजिबात अस्वच्छ ठेवू नका. पूजेच्या वेळी वाईट विचार मनात येऊ देऊ नका.

3. काळा रंग टाळा: हिंदू धर्मानुसार, कोणत्याही शुभ कार्यात किंवा देवाची पूजा करताना काळ्या रंगाचे कपडे घालण्यास मनाई आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका, तर पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. तसेच चंद्राला अर्घ्य अर्पण करताना पायावर पाणी पडणार नाही याची काळजी घ्या.

4. तुळशी अर्पण करू नका: भगवान श्री गणेशाच्या उपवास आणि पूजेच्या वेळी तुळशीचा वापर करण्यास मनाई आहे, म्हणून पूजा करताना, प्रसाद बनवताना किंवा अन्न अर्पण करताना तुळशी घालू नका.

5. सात्विक भोजन: जर तुम्ही उपवास धरत असाल तर घरामध्ये लसूण आणि कांदा अजिबात वापरू नका. याशिवाय घरातील कोणालाही मांस किंवा मद्य सेवन करू देऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT