news-stories

साता-यात अजब  कारभार, पालिकेच्या तिजोरीवर हायड्रोलिक क्रेनचा भार!

सिध्दार्थ लाटकर

सातारा : दहा व अकरा दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी सातारा पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार नाक्यावरील सर्वात मोठ्या कृत्रिम तळ्यात मूर्ती विसर्जन केले जाणार आहे. विसर्जनासाठी तब्बल शंभर टनी हायड्रोलिक क्रेनचा उपयोग केला जाणार आहे. वास्तविक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक गणेश मंडळांना चार फुटांवरती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी प्रतिबंध केले. त्याचे शहरातील सर्वच मंडळांनी स्वागत करत मूर्ती लहान बसवण्याचा निर्णय घेतला. यंदा सर्वच मंडळाच्या गणेश मूर्ती उंचीने लहान आहेत. तरीही पालिका प्रशासनाला शंभर टनी हायड्रोलिक क्रेनची गरज का भासावी, असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

दरवर्षी शहरात मोठ-मोठ्या गणेशमूर्ती असतात, त्यामुळे अशा मोठ्या मूर्तींचे विसर्जन करणे थोडे जिकरीचे असते. त्यामुळे हायड्रोलिक क्रेनची गरज भासते. मात्र, यंदा प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत शहरात लहान मूर्ती बसविण्यात आल्या. काही मोठ्या मंडळांनी मूर्ती न बसविण्याचा निर्णय घेतला. असे असताना पालिकेला शंभर टनी हायड्रोलिक क्रेनची गरज का भासावी, कोरोना काळात पालिकेच्या तिजोरीवर इतका भुर्दंड कशा करता, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. पालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडला तर नागरिकांसाठी हा भुर्दंडच असणार आहे. पालिकेने जरी सेफ्टीसाठी ही क्रेन आणली असली तरी, गणेशमूर्ती लहान असल्याने याची आवश्यकता नसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

बुधवार नाका परिसरात पालिकेची पाणी साठवण टाकी आहे. या टाकीशेजारी असलेली मोकळी बुधवार जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. याच जागेवर पालिकेकडून ५० मीटर लांब, २५ मीटर रुंद आणि १२ मीटर खोलीचे कृत्रिम तळे उभारण्यात आले आहे. दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीचे या तळ्यात विसर्जन केले जाते. यंदा विसर्जनासाठी शहरातील सुमारे ७५ पेक्षा अधिक मंडळांनी पालिकेत नोंदणी केली आहे. या तळ्यात पाणीसाठा करण्यात आला असून, सुरक्षेसाठी बॅरिकेट्स बसविण्यात आले आहेत. या शिवाय विजेची व्यवस्था करून मचानही उभारण्यात आले आहे. यंदाही विसर्जनासाठी शंभर टन वजनाची हाटड्रोलिक क्रेन पुण्याहून मागविली आहे. जिल्हा प्रशासनासह पालिकेकडून विसर्जनासाठीची नियमावली जाहीर केली आहे.

दरम्यान, विसर्जनासाठी मंडळाच्या केवळ पाच सदस्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तळ्यावर गर्दी होऊ नये, यासाठी विसर्जनावेळी गणेशाची आरती करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे मंडळांना मूर्ती विसर्जनाला घेऊन येण्यापूर्वीच पूजा-अर्चा करावी लागणार आहे. विसर्जनस्थळी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त केला जात असून उद्या होणा-या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या पदाधिका-यांकडून विसर्जनस्थळाची पाहणी केली जात आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Administrative Reshuffle : प्रशासनात मोठा भूकंप! १५ IAS अधिकाऱ्यांसह ३८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; पाहा कोणाची कुठे झाली रवानगी?

IND vs WI, 3rd ODI: केएल राहुलचं क्लासिकल शतक! रोहित-ऋतुराजची अर्धशतकं; भारताने वेस्ट इंडिजसमोर उभा केला धावांचा डोंगर

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Latest Marathi News Live Update : आरोपी नीलेश आरते याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

SCROLL FOR NEXT