Israel-Hamas  esakal
ग्लोबल

Israel-Hamas : गाझाला एक लाख इस्रायली सैनिकांचा वेढा; 'असं' होणार ग्राऊंड ऑपरेशन

संतोष कानडे

नवी दिल्लीः हमासच्या विरोधात इस्राइलचं युद्ध पेटलेलं आहे. त्यातच इस्रायली लष्कर आणि रणगाडे गाझा बॉर्डरजवळ पोहोचले आहेत. कुठल्याही क्षणी सैन्याचं ग्राऊंड ऑपरेशन सुरु होऊ शकतं.

इस्रायली लष्कराच्या १ लाख सैनिकांनी गाझाला वेढा घातला असून इस्रायली रणगाडे गाझाकडे वेगाने सरकू लागले आहेत. इस्रायली सैनिक सरकारच्या आदेशाची वाट बघत असल्याची माहिती मिळत आहे. ग्राऊंड ऑपरेशनसाठी सैन्य गाझामध्ये उतरू शकतं. इस्रायलने हमासला २४ तासांचा अल्टिमेटम दिला असून २४ तासांत गाझा सोडण्यास सांगितले आहे.

सर्व पाश्चिमात्य देश इस्रायलला पाठिंबा देत आहेत. एवढंच नाही तर युद्धासाठी मदतही करत आहेत. इस्रायलने गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना दक्षिणेकडील भागाकडे स्थलांतरित होण्यास सांगितले आहे. तो भाग इजिप्तची सीमा आहे आणि तुलनेने सुरक्षित मानला जातो.

गाझामध्ये हमासचे जेथे तळ आहेत, ते नष्ट केले जातील, असे इस्रायलने स्पष्ट केले आहे. इस्रायली संरक्षण दलाने (IDF) गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी येथून दक्षिणेकडे जाण्याचे आवाहन केले आहे.

इस्राइल आणि हमास संघर्षाचा शुक्रवारचा सातवा दिवस आहे. दोन्ही गटांमध्ये अजूनही तुंबळ संघर्ष सुरु आहे. त्यातच हमासने ७ ऑक्टोंबर रोजी केलेल्या हल्ल्याचा एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हमासने दावा केलाय की, त्यांनी इस्राइली लष्करी तळावर हल्ला केलाय.

इस्राइलने केलेल्या दाव्यानुसार १२०० पेक्षा जास्त लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. तर २ हजारांपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. हमासचे जवळपास एक हजार नागरिक मारले गेल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT