20 cats take owners life; been starving for two weeks 20 cats take owners life; been starving for two weeks
ग्लोबल

२० मांजरींनी घेतला मालकिणीचा जीव; दोन आठवड्यांपासून होत्या उपाशी

सकाळ डिजिटल टीम

मॉस्को : रशियात जवळपास २० मांजरी (cats) महिलेला इतक्या चावल्या की तिचा मृत्यू (Killed) झाला. पोलिस अधिकाऱ्यांना दोन आठवड्यानंतर तिचा मृतदेह सापडला. तिच्या मृतदेहाचे फक्त काही भाग उरले होते. हा प्रकार पाहून पोलिस कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. ही घटना रशियाच्या रोस्तोव भागातील बटायस्क भागात घडली. सध्या मांजर लोकप्रियतेच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. (20 cats take owners life; been starving for two weeks)

महिला बेपत्ता झाल्याची तक्रार सहकारी महिलेने पोलिसांना दिली होती. कारण, ती तिच्या बॉसशी संपर्क करू शकत नव्हती. यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. पोलिसांना महिलेचा अर्धवट खाल्लेला मृतदेह तिच्या घरात मांजरींनी वेढलेला आढळला. मृतदेहाचे अवशेष कुजण्यास सुरुवात झाल्याने दोन आठवड्यांपूर्वी महिलेचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

मांजरींना (cats) दोन आठवड्यांसाठी घरात एकटे सोडण्यात आले होते. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केलेली नव्हती. मांजरींना खूप भूक (Starvation) लागली होती. दोन आठवड्यांनी मालकीण दिसताच तिला खायला सुरुवात केली, असे प्राणी बचाव तज्ज्ञाने सांगितले.

भुकेमुळे मांजरी झाल्या हिंसक

महिलेचा जीव घेणाऱ्या मांजरींची प्रजाती जगभरात खूप लोकप्रिय आहे. या प्रजातीच्या मांजरींना लोक घरी पाळतात. साधारणपणे या मांजरींची वागणूक अतिशय सौम्य असते. मात्र, भूक लागल्याने या मांजरींनी हिंसक वर्तन केल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT