तालिबान  sakal
ग्लोबल

तालिबान राजवटीत ४० व्यापाऱ्यांचे अपहरण

शस्त्रे परवाने नसल्याने चिंता व्यक्त; अनेकांची हत्या झाल्याची भीती

सकाळ वृत्तसेवा

काबूल : अफगाणिस्तानात तालिबानने ताबा मिळवल्यानंतर राजधानी काबूलसह देशातील विविध भागातील ४० हून अधिक व्यापाऱ्यांचे अपहरण झाले आहे. त्यापैकी अनेकांची हत्या करण्यात आली आहे. अफगाणिस्तान चेंबर ऑफ कॉमर्स ॲड इंडस्ट्रीज (एसीसीआय) ने माहिती दिली. व्यापाऱ्यांच्या वाढत्या अपहरणाबद्दल संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.

एसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, काबूल, कंदाहार, नांगरहार, कुडुंझ, हेरत, बाल्क प्रांतात व्यापाऱ्यांच्या अपहरणाचे प्रकार घडले आहेत. एसीसीआयचे पदाधिकारी खान जान अलोकोजई म्हणाले की, देशात आतापर्यंत ४० हून व्यापाऱ्यांचे अपहरण झाले आहे. त्यापैकी अनेकांचा जीव गेला आहे. व्यापाऱ्यांकडील शस्त्रे तालिबानने काढून घेतल्यामुळे अपहरणाचे प्रकार घडत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. अपहरकर्त्यानी संघर्ष करताना चार व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. व्यापाऱ्यांकडे स्वसंरक्षणाचे कोणतेही साधने नसल्यामुळे हत्या आणि अपहरणाच्या घटना घडत आहेत. ‘टोलो’ न्यूजने म्हटले की, अफगाणिस्तानचे अंतर्गत व्यवहार मंत्रालयाकडून लवकरच व्यापाऱ्यांना शस्त्रे परवाने देण्यात येणार आहेत. गृहमंत्रालयाचे प्रवक्ते सईद खोस्ती म्हणाले की, शस्त्रे परवाना देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. त्यांचा जुना परवाना जमा करून नवीन जारी केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT