Elizabeth Sakal
ग्लोबल

एलिझाबेथ यांच्या नावावर नवा विक्रम

प्रदीर्घ सत्ता गाजविलेल्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर

सकाळ वृत्तसेवा

लंडन - थायलंडचे दिवंगत राजे भूमिबोल अदुल्यदेज यांना मागे टाकून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय (वय ९६) या आज सर्वाधिक काळ सत्तेवर असलेल्या सत्ताधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आल्या आहेत. एलिझाबेथ यांना सत्तेवर येऊन ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ब्रिटनमध्ये गेल्या आठवड्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

थायलंडचे राजे भूमिबोल अदुल्यदेज हे १९२७ ते २०१६ या काळात, म्हणजे ७० वर्षे १२६ दिवस सत्तेवर होते. २०१६ पर्यंत, राजसत्तेचे अस्तित्व असलेल्या देशांमध्ये भूमिबोल हेच हयात असलेले आणि सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले राजे होते. मात्र, २०१६ मध्ये त्यांचे निधन झाल्यावर हा विक्रम राणी एलिझाबेथ यांच्या नावावर नोंदविला गेला. आता त्यांचा सत्तेवरील काळ भूमिबोल यांच्यापेक्षा अधिक झाल्याने एकूण सर्वाधिक काळ सत्तेवर असणाऱ्या राजघराण्यातील व्यक्तींमध्ये त्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या क्रमांकावर अद्यापही सोळावे लुईस हे आहेत. त्यांनी १६४३ ते १७१५ दरम्यान, म्हणजे ७२ वर्षे ११० दिवस फ्रान्समध्ये सत्ता गाजविली.

एलिझाबेथ यांच्याकडे १९५३ मध्ये राज्ञीपदाची सूत्रे गेली. २०१५ एलिझाबेथ यांनी राणी व्हिक्टोरिया यांचा विक्रम मागे टाकला. त्यांच्या सत्तेला आता ७० वर्षे पूर्ण झाल्यामुळे अनेक कार्यक्रम साजरे होत आहेत. ब्रिटिश राजघराणे परंपराप्रिय असले तरी आतापर्यंत सत्तेवरील ७० वर्षे कोणीच पूर्ण न केल्याने सर्व कार्यक्रमांची नव्या पद्धतीनेच अंमलबजावणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

Rural Protest: स्मशानभूमीचा रस्ता नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच सरण; दिगर ग्रामस्थांचा संताप, प्रशासनाचे लेखी आश्वासन

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Animal Welfare: सणांतील डीजे-फटाक्यांचा दणदणाट; मुक्या प्राण्यांमध्ये भीती, तणाव आणि कानाच्या विकारांच्या केसेसमध्ये ३०-४० टक्के वाढ

SCROLL FOR NEXT