Russia ukrain Crisis Sakal
ग्लोबल

रशियन सैनिक युक्रेनच्या महिलांना करताहेत फ्लर्टी मॅसेज!

Ukraine Russia War: रशियन सैनिक टिंडरवर फ्लर्टी संदेश पाठवत आहेत, असा दावा एका युक्रेनियन महिलेने केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Ukraine Russia Crisis: युक्रेन-रशियामधील युद्ध जवळपास सुरू झाले आहे. रशियाने युक्रेनवर बॉम्बहल्ले करायला सुरुवात केली आहे. युक्रेनची राजधानी कीव आणि खार्किव शहरासह विविध भागात स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली तेव्हापासून ही स्फोटांची मालिका सुरू झाली. दरम्यान, एका युक्रेनियन महिलेने दावा केला आहे की रशियन सैनिक तिला टिंडरवर फ्लर्टी संदेश पाठवत आहेत.

वास्तविक, युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर खार्किवपासून (Kharkiv) रशियन सैन्य फक्त 20 मैल दूर आहे. रशिया आणि युक्रेन (Ukraine Russia War) यांच्यात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, युक्रेनच्या एका महिलेने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे ज्यामध्ये रशियन सैनिक फ्लर्टिंगच्या उद्देशाने तिला सोशल मीडियावर मॅसेज पाठवत असल्याचा दावा केला आहे. अनेक सैनिकांनी महिलांना त्यांच्या पदांची माहिती त्यांच्या छायाचित्रांसह पाठवली आहे, असं तिने म्हटले.

द सनच्या रिपोर्टनुसार, युक्रेनियन महिलांना आकर्षित करण्यासाठी आंद्रेई, अलेक्झांडर, ग्रेगरी आणि मायकेल यांच्यासह डझनभर रशियन सैनिकांनी डेटिंग अॅपवर त्यांचे प्रोफाइल तयार केले आहेत. दशा सिनेलनिकोवा (Dasha Synelnikova) नावाच्या महिलेने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून अनेक रशियन सैनिक तिला टिंडरवर (Tinder) मेसेज आणि रिक्वेस्ट पाठवत आहेत.

रशियन सैनिक युक्रेनच्या महिलांना पाठवत आहेत संदेश:

३३ वर्षीय दशा सिनेलनिकोवा हिने 'द सन'ला सांगितले- 'मी युक्रेनमधील कीव (Kyiv) येथे राहते, परंतु एका मित्राने मला सांगितले की टिंडरवर बरेच रशियन सैनिक आले आहेत, म्हणून मी माझे लोकेशन सेटींग बदलून खार्किव (Kharkiv) केले. तिथेही मला रशियन सैनिकांचे मेसेज येऊ लागले.

दशा पुढे म्हणाली- एका पाठवलेल्या छायाचित्रात रशियन सैनिक घट्ट पट्टेदार बनियानमध्ये दिसत होता. दुसर्‍या चित्रात तो माणूस बेडवर पडलेले पिस्तूल घेऊन पोज देत होता. तथापि मला त्यापैकी एकही आकर्षक वाटला नाही. मी कधीही शत्रूशी बोलण्याचा विचार करणार नाही. मी टिंडरवर त्याची विनंती नाकारली. पण मेसेज पाठवणारे असे अनेक होते.

मेसेजमध्ये काय होते?

दरम्यान, दशा सिनेलनिकोवा 31 वर्षीय आंद्रेईसह (कथित रशियन सैनिक) बोलली. दशाने आंद्रेईला विचारले तू कुठे आहेस? तुम्ही खार्किवमध्ये आहात का? यावर आंद्रेई म्हणाला- "अर्थात मी खार्किवमध्ये नाही पण मी जवळ आहे, फक्त 80 किमी दूर आहे."

दशाने पुन्हा विचारले- "मला भेटण्याचा तुमचा काही प्लॅन आहे का?" यावर आंद्रेईने उत्तर दिले - "मी आनंदाने येईन पण 2014 पासून युक्रेनमध्ये रशियन लोकांचे स्वागत झाले नाही. दशाने पुन्हा विचारले- "तुम्ही काय करता?" यावर आंद्रेईने कोणतेही थेट उत्तर दिले नाही.

पण टिंडरवर येणारे सर्व संदेश रशियन सैनिकांचे असल्याचं या महिलेने सांगितले आहे. रशियन सैन्याचा गणवेश परिधान केलेले लोक अनेक प्रोफाइलमध्ये दिसत आहेत. महिलेने त्यांचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT