Amazon staff laid off Ten thousand jobs reduced notices to 260 employee sakal
ग्लोबल

Amazon Layoffs : केवळ मेल करून कामावरुन काढलं; कंपनी ५ महिन्यांचा पगार देणार

भारतातल्या हजारो कर्मचाऱ्यांना कपातीचा फटका बसला आहे.

सकाळ डिजिटल टीम

अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांनी कर्मचारी कपात होणार असल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. या कपातीचा फटका १८ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना बसणार असून यामध्ये भारतातल्याही अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं जॅसी यांनी सांगितलं.

गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेल्या अहवालांनुसार, अ‍ॅमेझॉन भारतातल्या विविध शाखांमधल्या साधारण १००० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करू शकते. अ‍ॅमेझॉनने जगभरातल्या आपल्या सर्वच शाखांमधून कर्मचारी कपातीला सुरुवात केली आहे. या कपातीचा फटका बसलेल्या कर्मचाऱ्यांशी कंपनी १८ जानेवारीनंतर संवाद साधेल, असं जॅसी यांनी म्हटलं आहे.

या कंपनीतून काढून टाकण्यात आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी लिंक्डइन आणि ट्विटरचा आधार घेतला आहे. आपल्याला कामावरुन कमी करण्यात आल्याचं त्यांनी पोस्ट करत सांगितलं आहे. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये फ्रेशर्स आणि अनुभवी दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अ‍ॅमेझॉनकडून कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्याचा इमेल करण्यात आला आहे. या कपातीबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या टीमच्या प्रमुखाला भेटण्याचंही मेलमध्ये सांगण्यात आलं आहे. या मेलमध्ये कर्मचाऱ्यांना ५ महिन्यांचा पगार मिळणार असल्याचंही सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Politics : गोकुळमध्ये पडद्यामागे राजकीय घडामोडी; अध्यक्ष निवडीआधी संचालकांना घरातून उचललं; सतेज पाटलांचे १३ संचालक सहलीवर, महायुतीचे संचालक गोव्याला जाणार?

Jobs For Agniveer: अग्निवीरांसाठी आनंदाची बातमी! परीक्षेविना थेट नोकरी, २५० हून अधिक जणांना नियुक्तीपत्रे

IND vs NZ 2nd T20I: भारत-न्यूझीलंड दुसरा सामना किती वाजता सुरू होणार? वैभव सूर्यवंशी Playing XI मध्ये दिसणार... Live कुठे दिसणार?

Numerology: 'या' मूलांकाच्या लोकांना प्रिय असते प्रायव्हसी,स्वत:ची स्पेस! पार्टनरसोबत असूनही एकटे राहणे का आवडते?

Latest Marathi News Live Update : दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?

SCROLL FOR NEXT