American journalist died in russian attack American journalist died in russian attack
ग्लोबल

रशियाने केलेल्या गोळीबारात अमेरिकन पत्रकाराचा मृत्यू; दुसरा जखमी

सकाळ डिजिटल टीम

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये अमेरिकन पत्रकाराचा मृत्यू झाला (American journalist died in russian attack) आहे. एएफपीने प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. युक्रेनमध्ये रशियन आक्रमण तीव्र होत असताना ही घटना घडली आहे. ब्रेंडट रेनॉड (५१) असे मृत पत्रकाराचे नाव आहे. (American journalist died in russian attack)

युक्रेनची राजधानी किव्ह येथे न्यूयॉर्क टाइम्सचे पत्रकार ब्रेंडट रेनॉड (५१) यांना गोळ्या लागल्या होत्या. रशियन सैन्याने इरपिनजवळ एका कारवर गोळीबार केला होता तेव्हा ही घटना (American journalist died in russian attack) घडली. त्यांच्यासोबत असलेला आणखी एक पत्रकार जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी पोलंड सीमेजवळ रशियन हवाई हल्ल्यात ३५ जण ठार झाले, तर ५७ हून अधिक जखमी झाले आहेत.

रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी किव्हचा वेढा तीव्र केला आहे. युक्रेनचा दावा आहे की रशियाने लिव्ह शहरात आठ मोठे हल्ले केले आहेत. यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. रशियाने हे हवाई हल्ले अशा वेळी केले आहेत जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक नेते या संकटावर मुत्सद्दीपणे तोडगा काढण्यात गुंतले आहेत.

रशियाने (Russia) लिव्ह येथील लष्करी प्रशिक्षण शिबिरावर आठ क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे, रशियाने युक्रेनच्या (Ukraine) राजधानीला पूर्व, उत्तर आणि ईशान्येकडून वेढा घातला असून जोरदार हल्ले सुरू केले आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही किव्हमधील प्रत्येक वळणावर रशियन सैन्याशी लढू, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

युक्रेनमध्ये रशियाचे हल्ले तीव्र होत असताना अमेरिकेने युक्रेनला दोनशे दशलक्ष डॉलरची लष्करी मदत जाहीर केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एक दिवस आधी ही घोषणा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांसाठी अलर्ट! आता 'इथून' ट्रेनमध्ये चढलात तर गुन्हा दाखल होणार; रेल्वेचा मोठा निर्णय

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

Jejuri Wari Accident: 'पंढरीच्या वाटेवर होतो, अन् मागून ट्रक आला अन्..' जखमी वारकरी महिलेने सांगितला थरारक अनुभव

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयाने अंकित शर्मा यांची हत्या आणि दंगल यांसारख्या गुन्ह्यांसाठी ताहिर हुसेनला दोषी ठरवले

Snake Bite : कोळवण येथे सर्पदंश झालेल्या रुग्णाचा मित्र व घरातील नातेवाईकांच्या तत्परतेने वाचला जीव; कोळवण येथे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे

SCROLL FOR NEXT