malala yousafzai 
ग्लोबल

मलाला युसफझाई हिच्याबरोबर ॲपल टीव्ही प्लसने केला करार

यूएनआय

इस्लामाबाद - पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती कार्यकर्ती मलाला युसफझाई हिच्याबरोबर ॲपल टीव्ही प्लसने करार केला आहे. काही वर्षे कालावधीच्या या करारानुसार मलाला महिला आणि मुलांवर केंद्रित असलेल्या नाटक आणि माहितीपटांची निर्मिती करेल.

मलाला २३ वर्षांची आहे. वयाच्या दहाव्या वर्षी तिने वायव्य पाकिस्तानात मुलींना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून मोहीम सुरु केली. त्यामुळे तिने तालिबानचा रोष ओढवून घेतला. २०१२ मध्ये ती १५ वर्षांची असताना तालिबान बंडखोरांनी तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यातून ती बचावली. त्यानंतर २०१४ मध्ये तिला नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले.

ॲपल टीव्ही प्लसने एका निवेदनात म्हटले आहे की, मलालाकडे जगभरातील लोकांना प्रेरित करण्याची क्षमता आहे, जी या करारामुळे आम्हाला वापरता येईल. आमच्या कार्यक्रमांमध्ये ॲनीमेशन आणि मुलांच्या मालिकांचाही समावेश असेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुटुंबाला एकत्र बांधण्याची, मैत्री दृढ करण्याची, चळवळींना चालना देण्याची आणि मुलांना स्वप्न पाहण्यास प्रेरित करण्याची ताकद कथांमध्ये आहे असा माझा विश्वास आहे. महिला, तरुण लोक, लेख आणि कलाकारांना त्यांच्या नजरेतील जगाचे चित्र मांडण्यासाठी पाठिंबा देण्याची संधी मला मिळाली आहे. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.
- मलाला युसुफझाई

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT