astrazeneca 
ग्लोबल

ॲस्ट्राझेनेका लसीकरण दक्षिण आफ्रिकेत स्थगित

यूएनआय

जोहान्सबर्ग - कोरोनावरील ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाच्या लसीचा वापर करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेने स्थगित केला आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराविरुद्ध लसीच्या परिणामकारकतेचा अभ्यास केल्यानंतर त्यातील निष्कर्ष निराशाजनक आढळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

दक्षिण आफ्रिकेला दहा लाख डोस मिळाले असून पुढील आठवड्यात लसीकरण सुरु होणार होते. आता जॉन्सन आणि जॉन्सन तसेच फायझर या दोन कंपन्यांच्या लसीचा वापर केला जाईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या देशातील कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये नव्या प्रकाराचा संसर्ग असलेल्यांचे प्रमाण ९० टक्के आहे. या अभ्यासात सुमारे दोन हजार व्यक्तींचा सहभाग होता. त्यात लसीमुळे अत्यल्प संरक्षण होत असल्याचे आढळून आले.

दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री झ्वेली एमखीझे यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले की, या अभ्यासातील निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर पुढे काय पावले टाकायची याबाबत आमचे सरकार सल्ला मिळण्याची प्रतिक्षा करेल. हा अभ्यास विट््वॉटर्सरँड विद्यापीठातर्फे करण्यात आला, पण त्याची स्वतंत्र गटातर्फे छाननी झालेली नाही.

अभ्यासातील निष्कर्ष

  • विषाणूच्या नव्या प्रकाराविरुद्ध सरस परिणाम साध्य होण्यासाठी लसीची फेरनिर्मिती आणि पूरक बदल होऊ शकेल
  • काही आठवडे किंवा महिन्यांत हे होऊ शकेल
  • प्राथमिक निष्कर्षानुसार मॉडर्नाची लस या प्रकाराविरुद्ध अजूनही परिणामकारक
  • फायझर-बायोएन््टेक लसही नव्या प्रकाराविरुद्ध परिणामकारक
  • ब्रिटनमधील विषाणूच्या प्रकाराविरुद्ध चांगला परिणाम साध्य होत असल्याची ॲस्ट्राझेनेकाची माहिती

ऑक्सफर्डचा दावा कायम
लसीच्या संशोधनात पुढाकार घेतलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रा. सारा गिल्बर्ट यांनी सांगितले की, तीव्र आजाराविरुद्ध लस अजूनही परिणामकारक ठरली पाहिजे. दक्षिण आफ्रिकेतील विषाणूच्या प्रकाराविरुद्ध संशोधकांकडून सुधारित लस नंतर मिळण्याची अपेक्षा आहे.

सौम्य, मध्यम आजारावरही...
हा अभ्यास प्रा. शाबीर माधी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. त्यांनी सांगितले की, दुर्दैवाने सौम्य आणि आणि मध्यम स्वरूपाचा आजार असूनही ॲस्ट्राझेनेका लस परिणामकारक ठरत नाही असे आम्हाला आढळून आले. सहभागी व्यक्तींचे सरासरी वय ३१ होते. त्यामुळे तीव्र संसर्ग असलेल्या व्यक्तींवर लस किती परिणामकारक ठरते याचे मोजमाप करता आले नाही. परिणामी वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींचे प्रतिनिधित्व यात उमटत नाही.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT