Narendra Modi, Sheikh Hasina 
ग्लोबल

चांगल्या प्रकारे शेजारधर्म पाळणारा भारत एक आदर्श देश - शेख हसीना

संपूर्ण जगात कोराना लसीकरण सुरू झाल्यानंतर भारताकडून शेजारील राष्ट्रांना मदतीचा हात पुढे करण्यात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

ढाका : कोरानासारख्या महामारीमध्ये (Corona Pandemic) औषधांचा पुरवठा केल्याबद्दल बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी पुन्हा एकदा भारताचे आभार मानले असून, भारत हा चांगला शेजारी असल्याचा मुत्सद्देगिरीचा आदर्श असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या कठीण काळात भारताने आवश्यक पुढाकार घेत मदत केल्याबद्दल हसीना यांनी भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) आभार मानले आहेत. (Bangladesh PM Sheikh Hasina On India Help )

कोरोना काळातही पाळला शेजारधर्म

संपूर्ण जगात कोराना लसीकरण (Corona Vaccination) सुरू झाल्यानंतर भारताकडून शेजारील राष्ट्रांना मदतीचा हात पुढे करण्यात आला होता. त्यावेळी भारताकडून मालदीव, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार या देशांना मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात आला होता. त्याशिवाय कोरोना रुग्णांना आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्ततादेखील करण्यात आली होती. भारताच्या या मदतीनंतर जगातील अनेक देशांकडून भारताचे कौतूक करण्यात आले होते.

युक्रेनमदील मदतीसाठी मानले होते आभार

यापूर्वी युद्धग्रस्त युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) अडकलेल्या भारतीयांची सुखरूप सुटका करण्यासाठी भारत सरकारकडून ऑपरेशन गंगा (Operation Ganga) राबवण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत भारत सरकारकडून भारताव्यतिरिक्त इतर देशांतील नागरिकांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आले होते. यामध्ये बांग्लादेशातील नऊ नागरिकांना समावेश होता. भारताच्या या मदतीनंतरदेखील बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT