Boris Johnson names son after doctors who saved his life 
ग्लोबल

जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचा बोरिस जॉन्सन यांच्याकडून सन्मान; केले असे काही... 

वृत्तसंस्था

लंडन : जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचा बोरिस जॉन्सन यांनी सन्मान केला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या बाळाचे नाव डॉक्टरच्या नावावरून ठेवले आहे. त्यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. या बाळाचे नाव जॉन्सन यांनी त्यांच्यावर करोनाचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावावरुन ठेवत अनोख्या पद्धतीने डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सायमंड्स यांनीच यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवरुन माहिती दिली.

विलफ्रड लॉरी निकोलस जॉन्सन असं या बाळाचे नाव असून निकोलस हे नाव जॉन्सन यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. निक प्रिन्स आणि निक हार्ट असं जॉन्सन यांच्यावर उपचार केले. हे दोन्ही डॉक्टर संसर्गजन्य रोग आणि व्हेंटिलेटर्स स्पेशॅलिस्ट आहेत. बाळाच्या नावाबद्दल सायमंड्स यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे.

विलफ्रड हे बोरिस यांच्या आजोबांचे नाव आहे. लॉरी हे माझ्या आजोबांचे नाव आहे. तर निकोलस हे डॉक्टर निक प्रिन्स आणि निक हार्ट यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. याच दोन डॉक्टरांनी मागील महिन्यामध्ये बोरिसचे प्राण वाचवले, असं नावाचं स्पष्टीकरण सायमंड्स यांनी पोस्ट केलं आहे. ट्विटवरुनही त्यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हिसमधील डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

२७ एप्रिल रोजी पुन्हा सरकारच्या कोविड १९ विरोधी दलाची सूत्रे हाती घेणाऱ्या जॉन्सन यांनाही १२ एप्रिल रोजी डिस्चार्ज मिळाल्यानंतर डॉक्टरांचे आभार व्यक्त करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी माझे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानतो असं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT