pop francis 
ग्लोबल

पोपनी परंपरेला दिला छेद; प्रमुख चर्चमध्ये पहिल्यांदाच महत्त्वाच्या पदी महिलेची नियुक्ती

सकाळन्यूजनेटवर्क

व्हॅटिकन सिटी-पोप फ्रान्सिंस यांनी  कॅथोलिक परंपरा मोडित काढत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी सायनोड बिशपच्या अंडरसेक्रेटरी म्हणून एका महिलेची नियुक्ती केली आहे. त्यामुळे या पदावर पहिल्यांदाच एका महिलेचे निवड झाली असून तत्वप्रणालीविषयी उपस्थित होणाऱ्या प्रश्वांबाबत मतदान करण्याचा अधिकार असणाऱ्या मुख्य समितीत त्यांना स्थान मिळालं आहे. मुळ फ्रेंचच्या असणाऱ्या नॅथली बॅककार्ट Nathalie Becquart या नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या दोन अंडरसेक्रेटरीपैकी एक आहेत. बॅककार्ट या 2019 पासून सायनोडमध्ये सल्लागार होत्या. 

प्रमुख चर्चच्या महत्त्वाच्या पदी महिलेची नियुक्ती झाल्याने निर्णय प्रक्रियेमध्ये अधिकाधिक प्रमाणात महिलांचा सहभाग वाढवण्याची पोप यांची इच्छा स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया सायनोडचे प्रमख सचिव मारिओ ग्रेच यांनी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून तज्ज्ञ सल्लागार म्हणून महिलांची सायनोडमधील नियुक्ती वाढली आहे. आता सिस्टर नॅथली बॅककार्ट यांच्या निवडीमुळे आणि त्यांना मिळालेल्या मताधिकारामुळे नवा दरवाजा उघडला गेला आहे, असं ते म्हणाले आहेत. 

पाकिस्तानी-खलिस्तानी अकाउंट बंद करा; सरकारचा ट्विटरला पुन्हा आदेश

सायनोडचे प्रमुखपद बिशप यांच्याकडे असते. यामध्ये काहींना मतादानाचा अधिकार असतो, तर काहींना नसतो. 2020 मध्ये सायनोडची पुढील बैठक होणार आहे. पोप फ्रान्सिंग यांनी चर्चमध्ये सुधारणांचा प्रयत्न चालवला असून त्यातूनच त्यांनी महिलांना चर्चेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी दिली आहे.  नॅथली बॅककार्ट यांच्यासह अंडरसेक्रेटरी म्हणून लुईस मरिन डे सान मार्टिन यांची नियुक्ती झाली आहे. 52 वर्षीय बॅककार्ट फ्रान्समधील सिस्टर आहेत. त्यांनी मॅनेजमेंटमधून मास्टर डिग्री घेतली आहे. चर्चमध्ये येण्यापूर्वी त्यांनी बोस्टनमध्ये शिक्षण घेतलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT