Donald trump family details his wife kids and grand kids marathi news  
ग्लोबल

Donald Trump : ट्रम्प यांचा गोतावळा लै मोठा! दोन घटस्फोटांनंतर केलंय तिसरं लग्न; 'इतकी' आहेत मुलं अन् नातवंडं

Donald Trump Family : डोनाल्ड ट्रम्प यांना तीन वेळा लग्न केलं आहे. पहिल्या दोन पत्नीसोबत त्यांचा घटस्फोट झाला आहे आणि सध्या ते मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत आहेत.

रोहित कणसे

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्यावर झालेल्या जिवघेण्या हल्ल्यानंतर ते पुन्हा राजकीय वर्तुळात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यांच्या भाषणातून ट्रम्प यांचे विचार सध्या सगळ्या जगभरात पोहचले आहेत. पण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी आयुष्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सध्या ट्रम्प यांचे अनेक नातवंड त्यांच्या प्रचारात काम करताना दिसत आहेत. याआधी त्यांचा धाकटा मुलगा बॅरन ट्रम्प देखील दिसला होता. याशिवाय त्यांच्या मुली इवांका आणि मेलानिया ट्रम्प देखील अनेकदा चर्चेत असतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात नेमके किती लोक आहेत, त्यांच्या किती बायका आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

किती बायका आहेत?

डोनाल्ड ट्रम्प यांना तीन वेळा लग्न केलं आहे. पहिल्या दोन पत्नीसोबत त्यांचा घटस्फोट झाला आहे आणि सध्या ते मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत आहेत. मेलानिया ट्रम्प यांनी 2005 मध्ये डोनाल्ड ट्रम्पशी लग्न केले. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, याकाळात सामजिक जीवनात मेलानिया बऱ्यापैकी सक्रिय होत्या, पण व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांचा वावर कमी झाल्याचे दिसते. मेलानिया यांना एक मुलगा आहे, त्याचे नाव बॅरन ट्रम्प आहे.

मार्ला मॅप्लेस या डोनाल्ड ट्रम्प यांची दुसरी पत्नी आहेत, ज्यांच्यापासून ट्रम्प यांनी घटस्फोट घेतला आहे. ट्रम्प यांच्या प्रचारात मार्ला फारशा सक्रिय दिसत नाहीत. मार्ला आणि डोनाल्ड ट्रम्प यांना एक मुलगी आहे, तिचे नाव टिफनी ट्रम्प आहे.

तर इव्हाना ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प यांना तीन मुले आहेत, ज्यात डोनाल्ड ट्रम्प जूनियर, इवांका ट्रम्प आणि एरिक ट्रम्प यांचा समावेश आहे. इव्हाना यांचे 2022 मध्ये निधन झाले आहे.

ट्रम्प यांना किती मुले आहेत?

ज्युनियर ट्रम्प हे डोनाल्ड ट्रम्प यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. ते सतत मीडियासमोर येत राहातात, त्यांचे लग्न व्हेनेसा ट्रम्पशी झाले होते, या दोघांना पाच मुले आहेत. त्यांच्या घटस्फोटानंतर, ट्रम्प जूनियर किम्बर्ली गिलफॉयलसोबत आहेत.

एरिक ट्रम्प ज्युनियर हा ट्रम्प यांचा भाऊ आहे आणि तो सार्वजनिक कार्यक्रमात क्वचितच दिसतो, परंतु एरिक ट्रम्प कुटुंबाचा व्यवसाय सांभाळतो. एरिक यांनी लारा युवान्स्कासोबत लग्न केले असून त्यांना दोन मुले आहेत.

इवांका ट्रम्प ही एरिक आणि ज्युनियर ट्रम्प यांची बहीण आहे, त्या भारत भेटीमुळे खूप चर्चेत आल्या होत्या. इवांका यांचे लग्न जेरेड कुशनरशी झाले असून त्यांना तीन मुले आहेत.

बॅरन ट्रम्प हा मेलानिया ट्रम्प यांचा मुलगा आहे. तो ट्रम्प यांच्यासोबत प्रचारात सहभागी झाला असून असे असले तरी देखील तो स्पॉटलाइटपासून दूर राहिला आहे.

टिफनी ट्रम्प- या डोनाल्ड ट्रम्प यांची तिसरी पत्नी मारला मॅल्पेसच्या कन्या आहेत. त्या राजकारणात अजिबात सक्रिय नाहीत. इतकेच नाही तर त्या ट्रम्प यांच्या प्रचारात कुठेच दिसत नाहीत. त्यांनी 2022 मध्ये मायकेल बुलोसशी लग्न केले आहे.

ट्रम्प यांना नातवंडे किती?

ट्रम्प यांच्या तिसऱ्या पिढीबद्दल सांगायचे तर त्यांचा मोठा मुलगा ज्युनियर ट्रम्प यांना तीन मुले आहेत, त्यांची नावे काई, डोनाल्ड-3, ट्रिस्टन, स्पेन्सर, क्लो अशी आहेत.

इवांका ट्रम्प यांना तीन मुले आहेत, त्यांची नावे अरबेला, जोसेफ, थिओडोर अशी आहेत.

एरिक ट्रम्प यांना दोन मुले आहेत, त्यांची नावे एरिक आणि कॅरोलिना आहेत. याशिवाय बॅरन आणि टिफनी ट्रम्प यांना मुले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT