Donald Trump  
ग्लोबल

Donald Trump Shooting: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारे 2 शुटर्स ठार, चकमकीचा Video आला समोर

Donald Trump rally shooting: जवळपास बंदुकीचे नऊ राऊंड फायर करण्यात आले. एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्यावर दोन हल्लेखोरांनी हल्ला केला होता.

कार्तिक पुजारी

वॉशिंग्टन- अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. यात ते थोडक्यात बचावले आहेत. एका रॅलीला संबोधित करत असताना अचानक हल्ला करण्यात आला. जवळपास बंदुकीचे नऊ राऊंड फायर करण्यात आले. एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्यावर दोन हल्लेखोरांनी हल्ला केला होता.

स्थानिक माध्यमांनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन्ही शुटर्संना ठार करण्यात आले आहे. एक शुटर सभेत गर्दीमध्ये होता, तर दुसरा इमारतीवर होता. दोघांनी ट्रम्प यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या होत्या. सुरक्षा रक्षकांनी शुटर्संना ठार केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी शुटर्स आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाल्याचं पाहायला मिळालं.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. अशाप्रकारच्या हिंसेला अमेरिकेमध्ये कसलेही स्थान नाही. अशी प्रवृत्ती निच आहे. म्हणूनच आपल्याला एकत्र यायचं आहे, असं बायडेन म्हणाले आहेत. कमला हॅरेस यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक पक्षाच्या नेत्यांनी ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

निवडणुकीनिमित्त डोनाल्ड ट्रम्प पेनेसेल्वेनिया येथे सभा घेत होते. यावेळी अचानक गोळीबार झाला. काही वेळ काय होतय हे कळालं नाही. डोनाल्ड ट्रम्प आहे त्या ठिकाणी खाली बसले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरलं आणि सुरक्षितपणे त्यांना बाहेर काढलं. माहितीनुसार, ट्रम्प यांच्या कानाला दुखापत झाली आहे. त्यांच्या कानातून रक्त येत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर त्यांना सोडण्यात आल्याची माहिती आहे. डोनाल्ड ट्रम्प हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हणालेत की, अशा भ्याड हल्ल्यांना ते घाबरणार नाहीत. दरम्यान, अमेरिकेमध्ये नोव्हेंबर महिन्यात अध्यक्षीय निवडणूक पार पडणार आहे. ट्रम्प प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT