donald trump 
ग्लोबल

ट्रम्प यांनी उमेदवारी स्वीकारली

पीटीआय

वॉशिंग्टन - अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाने अध्यक्षीय निवडणूकीसाठी जाहीर केलेली उमेदवारी आज स्वीकार केली आहे. यामुळे ट्रम्प हे सलग दुसऱ्यांदा या पदासाठी लढत देणार आहेत. अमेरिकेत तीन नोव्हेंबरला अध्यक्षीय निवडणूक होत असून ट्रम्प यांचा सामना डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि देशाचे माजी उपाध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी होणार आहे.

तीन दिवसांपूर्वी उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज ‘व्हाइट हाऊस’ येथे उमेदवार स्वीकृतीचे भाषण केले. 

यावेळी समर्थकांशी बोलताना ते म्हणाले की,‘‘तुमच्या पाठिंब्याच्या बळावर अमेरिकेने चार वर्षांत फार चांगली प्रगती केली आहे. आपले भविष्यही उज्ज्वल असून आपण पुढील चार वर्षांत अमेरिकेची आणखी जोमाने उभारणी करू.’’ अध्यक्ष पदासाठीच्या उमेदवाराने ‘व्हाइट हाउस’मधून भाषण केल्याचे नजीकच्या काळात घडलेले नाही. आजच्या या कार्यक्रमाला १५०० निमंत्रित लोक होते.    

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आम्हीच पहिल्या स्थानावर
कोरोना चाचण्यांच्या बाबतीत अमेरिकाच जगात पहिल्या क्रमांकावर असून भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला आहे. अमेरिकेने आतापर्यंत चार कोटींहून अधिक कोरोना चाचण्या केल्या आहेत. ‘अमेरिकेत कोरोनाबाधितांवर विविध प्रभावी पद्धतीने उपचार होत असून आता आम्ही प्लाझ्मा थेरेपीही सुरु केली आहे. योग्य उपचारांमुळे आम्ही लाखो लोकांचे जीव वाचविले असून मृत्यूचा दर वेगाने कमी झाला आहे, ’असा दावा ट्रम्प यांनी यावेळी केला.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जनतेचे अध्यक्ष
डोनाल्ड ट्रम्प हे जनतेचे अध्यक्ष असून त्यांच्या सरकारने आतापर्यंत लोकाभिमुख धोरणे राबविल्याचा दावा ट्रम्प यांच्या सल्लागार आणि कन्या इव्हान्का ट्रम्प यांनी केला. माध्यमे आणि आपल्या पक्षाच्या वेडगळ मागण्या पूर्ण करण्यासाठी काहीही करणारे सरकार जनतेला नको आहे. व्हाइट हाऊसमध्ये आणखी चार वर्षांसाठी एक योद्धाच हवा आहे, असे इव्हान्का यांनी वडिलांच्या समर्थनार्थ भाषण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran–US War Escalation : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने दुबईसह अनेक ठिकाणी हल्ले वाढवले, अनेक देशांत मंदीची शक्यता

Latest Marathi News Live Update : कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका

Success Story: कठीण परिश्रम आणि चिकाटीचा फळ; यूपीएससीत गोंदियाच्या श्रवण मुंदडा याला २७५ वा रॅंक

Anurag Dobhal: १५० किमी वेगात कारची धडक; लाईव्हमध्येच जीवन संपवण्याचा प्रयत्न? बिग बॉस स्टार अनुराग डोवालचा VIDEO समोर

Beed News: डोळेच काय, माझा मुलगाच घ्या; वडिलांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, उपस्थितांना आले गहिवरून

SCROLL FOR NEXT