Dubai rain 
ग्लोबल

VIDEO: दुबई झाली तुंबई, वाळवंटात आला पूर! आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्यात; शाळा बंद, वाहतूक विस्कळीत

Heavy Rains VIDEOS: पश्चिम आशियातील देश युनायटेड अरब अमिराती हा वाळवंटी देश म्हणून ओळखला जातो. पण, सध्या या देशात पावसाने हाहाकार माजवला आहे

कार्तिक पुजारी

United Arab Emirates: पश्चिम आशियातील देश युनायटेड अरब अमिराती हा वाळवंटी देश म्हणून ओळखला जातो. पण, सध्या या देशात पावसाने हाहाकार माजवला आहे असंच म्हणावं लागेल. अनेक भागात पुराची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा सर्वात मोठा फटका दुबईला बसला आहे. दुबईला येणारी अनेक विमाने दुसरीकडे वळवण्यात आली आहेत. (Dubai rain Airport flooded India flights hit schools shut cars under water)

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे अनेक फ्लाईट काही काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत. भारतातून दुबईला जाणाऱ्या फ्लाईटना देखील याचा फटका बसला असल्याचं कळतंय. शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शिवाय वाहतूक बंद झाली आहे. (Heavy Rains VIDEOS)

दुबई विमानतळ हे जगातील सर्वाधिक व्यस्त विमानतळापैकी एक आहे. त्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागला आहे. १६ एप्रिलच्या अनेक फ्लाईट उशिरा धावत आहेत किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. भारत, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाईटना याचा मोठा फटका बसला आहे. दुबईतील पुराच्या परिस्थितीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दुबईमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पूर आला आहे. रस्ते, वाहने पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. अनेक लोकांना आपली वाहने आहे तेथेच सोडावी लागली आहेत. दुबईतील पाऊस पाहून अनेकांना मुंबईची आठवण झाली आहे. कारण, मुसळधार पाऊस पडल्यानंतर मुंबईमध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण होती. मुंबई झाली तुंबई असं आपण म्हणतो पण सध्या मुंबईची झाली तुंबई असं आपल्याला म्हणता येईल.(Rain News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cab Rules: कॅब ॲग्रीगेटर धोरणात मोठा बदल! कॅब राईड रद्द करणे चालकांना महागात पडणार; सरकार आता 'इतका' दंड वसूल करणार

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा धडाका पाहायला व्हा सज्ज... टीम इंडियाने टॉस जिंकला, Playing XI मध्ये एकाचे पदार्पण, कोण आहे Ashok Sharma?

Mumbai Police: 'खिशात पावडर टाकून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करेन', मुलांना धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन; गृह विभागाचा दणका

Latest Marathi Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला

'तिला कॅन्सर झालाय आता ती लवकरच...' सविता मालपेकरांचं टक्कल पाहून पसरलेली अफवा, मांजरेकराकडे रडत जात म्हणालेल्या...

SCROLL FOR NEXT