Earthquake Esakal
ग्लोबल

Earthquake In Philippines : फिलीपिन्समध्ये पुन्हा 6.8 तीव्रतेचा भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

या भूकंपामुळे कुठलीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाहीये.

रोहित कणसे

फिलीपिन्सच्या मिंडानाओ येथे आज रात्री उशीरा एक वाजून १९ मिनीटांनी ६.८ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे कुठलीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाहीये.

संयुक्त राज्य भूवैज्ञानिक सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दक्षीण फिलीपिन्सच्या किनाऱ्यावर ६.८ तीव्रतेचा भूकंप झाला . हा आफ्टरशॉक असू शकतो असेही सांगण्यात आले आहे. यापूर्वीही दोन दिवसांपूर्वी फिलीपिन्समध्ये भूकंप झाला होता.

त्सुनामीचा इशारा

भूकंप साकाळी चार वाजता (स्थानिुक वेळेनूसार) मिंडानाओ बेटांवर हिनाटुआन नगर पालिकेपासून जवळपास ७२ किलोमीटर उत्तर पूर्वेत ३० किलोमीटर खओल झाला.या खेरीज रविवारी ६.६ तीव्रतेचा भूकंप आणि शनिवारी त्याच भागात ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला होता. सततच्या भूकंपामुळे या भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवारी भूकंपमामुळे किमान दोन लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. यूएसजीएसने दिलेल्या माहितीनुसार, फिलीपिन्सला रविवारपर्यंत सहाहून अधीक तीव्रतेचे झटके बसले आहेत. शनिवारी आलेल्या भूकंपामुळे लोकांना आपल्या घरातून बाहेर पडावे लागले. या भागातील नागरिक दहशतीखाली आहेत, परिसरातील सर्व रुग्णालये रिकामी करावी लागली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: गर्भवती असतानाही Mains दिली; 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिली अन् थेट DSP झाली!

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

जरागेंच्या उपोषणाचा १० वा दिवस, प्रकृती खालावल्यानं मराठा बांधवांचा सरकारला इशारा | Jarange Patil

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

SCROLL FOR NEXT