ग्लोबल

भूक लागलेला हत्ती पोहोचला थेट किचनमध्ये; VIDEO VIRAL

सूरज यादव

एक हत्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात हत्ती किचनमध्ये घुसून काहीतरी शोधत असल्याचं दिसत आहे.

बँकॉक - थायलंडमधील एक हत्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात हत्ती किचनमध्ये घुसून काहीतरी शोधत असल्याचं दिसत आहे. हत्तीला भूक लागल्यानं तो एका घरात घुसला आणि भींत तोडून किचनपर्यंत पोहोचला असा दावा केला जात आहे. त्यात हत्ती सोंडेने किचनमध्ये काही शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचंही दिसतं.

हत्तीचा फोटो आणि व्हिडिओ घर मालकीनीने शेअर केला आहे. यात महिलेनं सांगितलं की, रात्री मोठा आवाज आल्यानं जेव्हा उठून पाहिलं तेव्हा किचनमध्ये हत्ती दिसला. तो सोंडेनं कपाटांमध्ये काहीतरी शोधत होता. महिलेनं याचा व्हिडिओ शूट केला असून तो रोज येतो असंही म्हटलं आहे.

दरम्यान, हत्ती घरात येत असल्याचं समजल्यानंतर डिपार्टमेंट ऑफ नॅशनल पार्क, वाइल्ड लाइफ अँड प्लांट कन्झर्व्हेशनने म्हटलं की, लवकर सरकारी संस्थेकडून घराची दुरुस्ती करण्यात येईल. तसंच स्थानिक अधिकारी या प्रकऱणी नुकसान भरपाईबाबतही बोलतील.

याआधी काही दिवसांपूर्वी चीनमध्ये हत्तींचा कळप एका जंगलात झोपल्याचं दिसलं होतं. त्यांचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला होता. 500 किमी अंतर प्रवास करताना हत्तींनी वाटेत बरीच नासधूस केली होती. त्यानंतर सर्व हत्ती एका जंगलात विश्रांती घेत असल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT