Elon Musk esakal
ग्लोबल

Elon Musk : मस्कला दुसरा क्रमांक मान्यच नाही; अब्जाधीशांच्या यादीत पुन्हा टॉपला

इलॉन मस्कच्या संपत्तीमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ६.९८ अब्ज डॉलर्स इतकी वाढ झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

जगातल्या अब्जाधीशांची नवी यादी प्रसिद्ध झाली आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्कने पुन्हा एकदा या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. या यादीनुसार, आता मस्क जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरला आहे.

मस्कच्या संपत्तीमध्ये गेल्या २४ तासांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आता इलॉन मस्कची संपत्ती १८७ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. त्यामुळे १८५ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले, आत्तापर्यंतचे पहिल्या क्रमांकाचे उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट आता दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत.

हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

Bloomberg Billionaires Indexनुसार, इलॉन मस्कच्या संपत्तीमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ६.९८ अब्ज डॉलर्स इतकी वाढ झाली आहे. यामुळे इलॉन मस्कने या यादीमध्ये पुन्हा पहिला क्रमांक मिळवला आहे.

दुसऱ्या क्रमांकावर बर्नार्ड अर्नाल्ट तर तिसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस आहे. त्यांची संपत्ती ११७ अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्या खालोखाल बिल गेट्स आणि वॉरन बफेट आहेत. त्यांची अनुक्रमे संपत्ती ११४ आणि १०६ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Bandh: देशभरात विद्यार्थ्यांचं आंदोलन! आज महाराष्ट्र बंद, कोणत्या सुविधा चालू तर कोणत्या बंद? जाणून घ्या...

RadhaKrishna Irrigation Project : कृष्णा नदीच्या पाण्यावरून वाद पेटला! कोल्हापुरातील प्रस्तावित धरणाला कर्नाटकचा तीव्र विरोध; कन्नड संघटनांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! शिवाजी पार्कवरून मोर्चा काढणार

Instagram New Feature : इंस्टाग्रामवर पोस्ट डिलीट न करता बदला गाणं; Replace Audio फीचर लॉन्च, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

IND vs ZIM Pitch Report: हरारेची खेळपट्टी आज नेमकी कशी खेळणार? फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? सामना FREE कुठे पाहणार?

SCROLL FOR NEXT