Elon Musks SpaceX ship blasts off with 2 US astronauts 
ग्लोबल

...अखेर स्पेस एक्सचे रॉकेट अवकाशात झेपावले

वृत्तसंस्था

केप कानाव्हेरल : स्पेस एक्स कंपनीच्या रॉकेटने नासाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन शनिवारी अवकाशात यशस्वी उड्डाण केले. त्यामुळे व्यावसायिक अंतराळमोहिमांच्या नव्या युगाला प्रारंभ झाला आहे. तसेच यानिमित्ताने विशेषत: अमेरिकेसाठी अंतराळ क्षेत्रातील संधीचे दरवाजे खुले झाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

स्पेस एक्सच्या या रॉकेटमधून नासाच्या डग हर्ली आणि बॉब बेहनकेन या दोन अंतराळवीरांनी अवकाशात उड्डाण केले. साधारण ५० वर्षांपूर्वी अपोलो अंतराळयान ज्या तळावरून अवकाशात झेपावले होते तेथूनच स्पेस एक्सच्या रॉकेटने उड्डाण केले. आता रविवारी हे यान अवकाशातील अमेरिकन स्पेस स्टेशनवर पोहोचेल.  हे दोन्ही अंतराळवीर त्याठिकाणी चार महिने थांबतील. यानंतर ते पुन्हा पृथ्वीवर परततील. या अंतराळ मोहीमेच्या यशामुळे खासगी उद्योजकांनाही नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. एलॉन मस्क यांची स्पेस एक्स कंपनी ही गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत होती. मात्र, या अंतराळमोहिमेच्या यशाने स्पेस एक्सच्या अंतराळात मानवी यान पाठवण्याच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनाच अंतराळात मानवी यान पाठवणे शक्य झाले आहे. 
-------
दिल्लीतील सर्वात मोठ्या कोविड रुग्णालयाचे संचालक कोरोना पॉझिटिव्ह
-------

सध्या अमेरिकेत कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एक लाखाहून अधिक अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच जॉर्ज फ्लॉयिड या कृष्णवर्णीयाच्या मृत्यूवरुन सध्या अमेरिकेत असंतोष खदखदत आहे. या पार्श्वभूमीवर या अंतराळ मोहीमेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांना नवी उमेद मिळेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पुणे जिल्ह्यातील १३ गावांचा संपर्क तुटला... मुसळधार पावसाचा परिणाम, स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण!

FIFA WORLD CUP: वर्ल्डकप स्पर्धेत डोनाल्ड ट्रम्प यांचा हस्तक्षेप; अमेरिकेचा हुकमी खेळाडू बालोगुनचे ‘रेड कार्ड’ फिफाकडून तात्पुरते रद्द

Latest Marathi News Update: कळमोडी धरण १०० टक्के भरलं, विसर्गामुळे चासकमानच्या पाणीसाठ्यात वेगानं वाढ

IND vs ENG: वेगवान गोलंदाजाचा समावेश निश्चित; बिश्नोईला डच्चू मिळण्याची शक्यता; भारत-इंग्लंड आज लढत

Lonavala Rain Update : लोणावळ्यात पावसाचे तांडव! 24 तासांत तब्बल 490 मिमी पाऊस; मावळ-कार्ला परिसरही जलमय, ग्रामीण भागातील गावांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT