omicron Omicron
ग्लोबल

Omicron : ओमिक्रॉनमुळे ब्रिटनमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद

विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

लंडन : संपूर्ण जगात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहे. दरम्यान, या नव्या विषाणूमुळे पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे जगाच्या चिंतेत वाढ झाली आहे. (Omicron First Death Recorded In UK) ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन ( British Prime Minister Boris Johnson) यांनी सोमवारी सांगितले की, ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनमुळे पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दक्षिण अफ्रिकेत आढळला होता पहिला रूग्ण

कोरानाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण दक्षिण अफ्रिकेत आढळून आला होता. (Omicron First case Found In South Africa ) त्यानंतर त्याचा प्रसार होऊन नये यासाठी अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक निर्बंध कडक केले आहेत. भारतानेदेखील (Covid Protocol In India)ओमिक्रॉनचा धोका असणाऱ्या हायरिक्स देशांमधून भारतात येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. तसेच परदेशातून भारतात दाखल होणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.

कर्नाटकात आढळला पहिला रूग्ण

दरम्यान, ओमिक्रॉन विषाणूने आता हळूहळू पाय पसरण्यास रिरुवात केली आहे. भारतातील पहिला ओमिक्रॉनचा रूग्ण कर्नाटकात आढळून आला होता. त्यानंतर देशभरात ओमिक्रॉनच्या रूग्णांची संख्या 38 वर पोहचली आहे. यामध्ये महाराष्ट्रात 18, गुजरात 03, राजस्थान 09, कर्नाटक 03, दिल्ली 02, चंदीगड 01, आंध्रप्रदेश 01 तर केरळ मध्ये 01 रूग्णाची नोंद करण्याती आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT