emmanual macron 
ग्लोबल

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्यूअल मॅक्रॉन कोरोना संक्रमित

सकाळवृत्तसेवा

गेल्या एक वर्षापासून कोरोना विषाणूचा कहर सातत्याने सुरु आहे. अद्यापही कोरोनापासून मानवजातीची सुटका झालेली नाहीये. युरोपातील अनेक राष्ट्रात तसेच अनेक आशियायी राष्ट्रात कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. कोरोनाच्या तडाख्यात अनेक जगप्रसिद्ध व्यक्तीही सापडल्या असून आता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्यूअल मॅक्रॉन हे कोरोना संक्रमित झाल्याची माहिती फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

याआधी इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील कोरोना संक्रमित झाले होते. 42 वर्षीय मॅक्रॉन हे कोरोना संक्रमित झाल्याचे निष्पन्न झाल्यावर ते 7 दिवस क्वारंटाईन असणार आहेत, असं एलिस पॅलेसच्या निवेदनात म्हटले आहे. तसेच अधिकाऱ्यांकडून हे स्पष्ट करण्यात आलंय की, मॅक्रॉन हेच राष्ट्राध्यक्ष पदावर असणार आहेत आणि ते दुरून पदभार सांभाळतील.

फ्रान्समध्ये झालेल्या इस्लामी कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यांनंतर घेतलेल्या कठोर भुमिकेमुळे मॅक्रॉन चर्चेत आले होते. त्यांनी धार्मिक कट्टरतेविरोधात ठाम भुमिका घेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केला आहे. फ्रान्सने या आठवड्यात तेथे वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी रात्री कर्फ्यू लावला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आतापर्यंत फ्रान्समध्ये वीस लाख कोरोना प्रादुर्भावित रुग्ण सापडले आहेत. आजवर फ्रान्समध्ये कोरोना कहरामुळे 59,400 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Flood News : पंचगंगा इशारा पातळीपासून अडीच फूट दूर, राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी; जिल्ह्यातील धरणात इतका पाणीसाठा

Washim: केनवड–कोयाळी रस्त्यावर मृत्यूचे सापळे; तारा लोंबकळल्या, रस्ते खचले; प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र गप्प

Latest Marathi News Live Update : मुंबई-पुणे रेल्वेसेवा आजही बंद राहणार

Pune Rain Update: पुण्यात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग; जंगली महाराज रोडवर जुने वृक्ष कोसळले, वाहतूक कोंडीची शक्यता

IMD Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ओसरला; पाऊस थांबणार, मुंबईसह घाटमाथ्यांवर इशारा

SCROLL FOR NEXT