ग्लोबल

Bomb Threat : रशिया-गोवा विमान उडवून देण्याची धमकी; २४० प्रवाशांचा जीव धोक्यात

सकाळ डिजिटल टीम

Moscow To Goa Flight : रशियाहून गोव्यात येणाऱ्या विमान उडवून देण्याच्या धमकीनंतर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

या विमानात अंदाजे दोन लहान मुलांसह २४० प्रवाशी प्रवास करत असून, सुरक्षेच्या कारणास्तव विमान उझबेकिस्तानला वळवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइटमध्ये २ मुले, ७ क्रू मेंबर्ससह एकूण २४० प्रवासी आहेत. अजूर एअर लाईन्सचं हे विमान रिशियाच्या पेराम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोव्याकडे निघाले होते.

मात्र, प्रवासादरम्यान, वैमानिकाला सुरक्षेसंबंधित अलर्ट जारी करण्यात आला. त्यानंतर आपतकालीन परिस्थितीत विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले आहे.

अजूर एअर लाईन्सचे AZV2463 विमानाच्या वैमानिकाला विमानात बॉम्ब असल्याचा अलर्ट देण्यात आला. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले आहे. हे विमान शनिवारी पहाटे ४.१५ वाजता गोव्यातील दाबोलीम विमानतळावर उतरणार होते.

डाबोलिम विमानतळ संचालकांना रात्री १२.३० वाजता विमानात बॉम्ब ठेवला असल्याचा ईमेल मिळाला. त्यानंतर गोव्याकडे निघालेले विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT