बँकॉक - यॉटवरील क्वारंटाइन उपक्रमाच्या चाचणीत सहभागी झालेले कर्मचारी. 
ग्लोबल

क्वारंटाइन व्हा यॉटवर; पर्यटनाला चालना देण्याची सरकारची योजना

यूएनआय

बँकॉक - थायलंडला भेट देणारे परदेशी पर्यटक क्वारंटाइनचे दोन आठवडे यॉटवर काढू शकतात. तसा निर्णय थायलंड सरकारने घेतला आहे. हे क्वारंटाइन अनिवार्य आहे. याआधी जानेवारीत क्वारंटाइनसाठी गोल्फ कोर्सची योजना सरकारने जाहीर केली होती. गोल्फ कोर्स विस्तीर्ण असल्यामुळे पर्यटकांना हा खेळ खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. आता डिजिटल इकॉनॉमी प्रमोशन कंपनीने ही योजना जाहीर केली आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्चमध्ये थायलंडने परदेशी पर्यटकांना प्रवेश बंद केला होता. ऑक्टोबरपासून सीमा हळूहळू खुली करण्यात आली. आता कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचा अहवाल घेऊन दाखल होणाऱ्या पर्यटकांना फुकेटमधील यॉट किंवा छोट्या क्रुझ शीपवर प्रवेश दिला जाईल. फुकेट हे लोकप्रिय पर्यटन केंद्र आहे. तेथे दिवसाला पर्यटकांची ४० ते ५० हजार संख्या आता फक्त काही शेर्यंत आली आहे.

या उपक्रमासाठी काही यॉट व्यावसायिकांच्या नोंदणीला यापूर्वीच प्रारंभ झाला आहे. उपक्रमाला प्रारंभ झाल्यानंतर त्यात सुमारे शंभर यॉट व्यावसायिक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

स्मार्ट रिस्टबँड अनिवार्य
थायलंडमध्ये पर्यटकांना स्मार्ट रिस्टबँड घालणे अनिवार्य आहे. त्यात शरीराचे तापमान, रक्तदाब अशा महत्त्वाच्या लक्षणांचा तपशील नोंदविला जातो. याशिवाय जीपीएसच्या माध्यमातून त्याच्या ठावठिकाण्याचीही नोंद राहते. मुख्य म्हणजे समुद्रात असतानाही दहा किलोमीटर परिघात माहितीचे प्रसारण होऊ शकते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यॉट पर्यटनाला उत्पन्न
कोरोनाच्या जागतिक साथीमुळे पर्यटनाला फटका बसला आहे. त्यात यॉट पर्यटनाची स्थिती आणखी गंभीर आहे. अशावेळी १.८ अब्ज बाह्त (५८ दशलक्ष डॉलर) इतके उत्पन्न या क्षेत्राला मिळेल अशी आशा थायलंडला आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT