Hamid Karzai esakal
ग्लोबल

माजी राष्ट्राध्यक्षांसह मंत्र्यांना तालिबानं ठेवलं 'नजरकैदेत'

बाळकृष्ण मधाळे

काबूल (अफगाणिस्तान) : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई (Hamid Karzai) यांना काबूलमध्ये नजरकैदेत ठेवले आहे, अफगाणिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सलोखा परिषदेचे अध्यक्ष अब्दुल्ला अब्दुल्ला (Abdullah Abdullah) यांनाही त्यांच्या घरात कैद करण्यात आल्याचे वृत्त आहे. तालिबानने या दोन वरिष्ठ अफगाण नेत्यांची सुरक्षाही काढून घेतली असून हे दोन्ही नेते तालिबानशी सरकार स्थापनेसाठी चर्चेत सहभागी झाले होते. रशियन वृत्तसंस्था (स्पुतनिक) सीएनएनच्या (CNN) वृत्ताने म्हटले आहे, की तालिबानने या दोन नेत्यांच्या कारही जप्त केल्या आहेत. दरम्यान, तालिबानने बुधवारी अब्दुल्लांच्या घराची झडती घेतली होती.

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई (Hamid Karzai) यांना काबूलमध्ये नजरकैदेत ठेवले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला तालिबानने करझाई, अब्दुल्ला आणि तालिबानचे सह-संस्थापक अब्दुल गनी बरादर यांना अफगाणिस्तानच्या 12 सदस्यांच्या परिषदेत समाविष्ट केले होते. 15 ऑगस्ट रोजी राजधानी काबूल, तसेच देशातील इतर सर्व प्रांतांचा ताबा घेतल्यानंतर तालिबान नवीन सरकार स्थापनेच्या प्रक्रियेत आहे. तालिबानने या दोन वरिष्ठ नेत्यांना नजरकैदेत का ठेवले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दोन्ही नेत्यांचे तालिबानशी दीर्घ काळापासून घनिष्ट संबंध होते आणि मगच, तालिबानने काबूल काबीज केले. तेव्हाही या दोन नेत्यांनी त्यांच्याशी समेट घडवून आणली होती. या अशा स्थितीत हमीद करझाई आणि अब्दुल्ला यांच्या अटकेवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

तालिबानचे सह-संस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर, तालिबान संस्थापक मुल्ला उमर यांचा मुलगा मुल्ला मोहम्मद याकूब आणि हक्कानी नेटवर्कचे सर्वात वरिष्ठ सदस्य खलील हक्कानी हे नेतृत्व परिषदेत तीन सर्वात शक्तिशाली पुरुष असतील, तर हे तिघेही अफगाणिस्तान सरकारचा सर्वात मोठा चेहरा असतील. या तिघांपैकी एक किंवा दोन जरी सरकारमध्ये समाविष्ट नसले, तरीही ते सरकार चालवण्यासाठी पडद्यामागे काम करतील, असेही स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT