Volodymyr Zelensky टिम ई सकाळ
ग्लोबल

युक्रेन यापुढे NATO सदस्यत्वासाठी आग्रह धरणार नाही; रशियासमोर झेलेन्स्की नरमले

सकाळ डिजिटल टीम

एका वृत्तवाहिनीला सोमवारी रात्री दिलेल्या एका मुलाखतीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय की, नाटो (NATO) युक्रेनला स्वीकारण्यास तयार नाही, हे आम्हाला समजल्यानंतर मी या प्रश्नाबाबत बराच काळ गोठून गेलो आहे.

पुढे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, ते आता यापुढे नाटोच्या सदस्यत्वासाठी त्यांच्यावर दबाव आणणार नाहीत. कारण ही एक अत्यंत नाजूक समस्या आहे ज्यामुळे रशियाने त्यांच्यावर आक्रमण केलं आहे.

रशियाला शांत करण्याच्या उद्देशाने झेलेन्स्की सकारात्मक बोलताना दिसत आहेत. यावेळी दुसर्‍यांदा सकारात्मक बोलताना झेलेन्स्की म्हणाले की, 24 फेब्रुवारी रोजी आक्रमण करण्यापूर्वी ते रशियन समर्थक असलेल्या प्रदेशांच्या स्थितीवर तडजोड करण्यास तयार आहेत. हे प्रदेश या आक्रमणापूर्वी स्वतंत्र म्हणूनच ओळखले जात होते. एबीसी न्यूजवर सोमवारी रात्री प्रसारित झालेल्या एका मुलाखतीत झेलेन्स्की (Zelensky) यांनी म्हटलंय की, "नाटो युक्रेनला स्वीकारण्यास तयार नाही, हे आम्हाला समजल्यानंतर मी या प्रश्नाबाबत बराच काळ गोठून गेलो आहे.

नाटो या वादग्रस्त गोष्टीबाबत तसेच रशियासोबत होणाऱ्या संघर्षाला घाबरत आहे, असंही राष्ट्राध्यक्ष पुढे म्हणाले. नाटो सदस्यत्वाचा संदर्भ देताना झेलेन्स्की यांनी ठामपणे सांगितलं की, ते अशा देशाचा राष्ट्राध्यक्ष होऊ इच्छित नाही जो गुडघ्यावर बसून कशाची तरी भीक मागत आहे.

रशियाने म्हटलंय की, शेजारील देश युक्रेन हा नाटोमध्ये सहभागी व्हावा, असं त्याला वाटत नाही. नाटो ही संघटना शीतयुद्धाच्या प्रारंभी युरोपला सोव्हिएत युनियनपासून वाचवण्यासाठी तयार करण्यात आलेली ट्रान्साटलांटिक युती आहे. अलीकडच्या काही वर्षांत ही संघटना पूर्वीच्या सोव्हिएत गटातील देशांना ताब्यात घेण्यासाठी पूर्वेकडे अधिकाधिक विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे, ज्यामुळे हा रोष उत्पन्न झाला आहे. नाटोच्या हा विस्तार रशियाला धोका वाटतो, कारण नाटो आपल्या नव्या पाश्चात्य मित्र देशांच्या दारात लष्करी पावित्र्यात उभा ठाकतो.

पूर्व युक्रेनमधीलच डोनेस्तक आणि लुगांस्क हे दोन प्रदेश फुटीरतावादी प्रदेश युक्रेनपासून स्वतंत्र व्हावेत आणि त्यांना सार्वभौम अशी मान्यता मिळावी, अशी पुतिन यांची इच्छा आहे. 2014 पासून हे दोन प्रदेश फुटण्यासाठी युक्रेनसोबत अंतर्गत लढा देत आहेत. रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वीच पुतिन यांनी या दोन प्रदेशांना स्वतंत्र असल्याचं संबोधलं होतं.

रशियाच्या या मागणीबद्दल विचारल्यावर झेलेन्स्की यांनी म्हटलंय की ते संवादासाठी खुले आहेत. मात्र, मी सुरक्षेच्या हमीबद्दल बोलत आहे, असंही ते ठामपणे म्हणाले. ते म्हणाले की हे दोन प्रदेश म्हणजे छद्म प्रजासत्ताक आहेत. मात्र, हे प्रदेश कसे राहावेत यावर आम्ही चर्चा करू शकतो आणि तडजोड शोधू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT