Khalistani Separatist Pannun Esakal
ग्लोबल

पन्नू हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेच्या कारवाईवर भारताचं मोठं वक्तव्य! म्हटलं, हे कृत्य म्हणजे...

कॅनडा भारतविरोधी कट्टरपंथियांना आश्रय देत असल्याचा पुनरुच्चार परराष्ट्र मंत्रालयानं केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवतसिंह पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपांखाली अमेरिकेकडून कथितरित्या भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल केला आहे. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं हा प्रकार गंभीर असल्याचं म्हटलं आहे.

आमच्या सरकारी धोरणाच्या विरोधातील अमेरिकेचं कृत्य असल्याचं मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर संगठित गुन्हेगारी, तस्करी, हत्यारांची तस्करी आणि कट्टरपंथीयांची युती हे गंभीर आहे. यासाठीच उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जावी अशी मागणीही भारतानं केली आहे.

बागची म्हणाले की, "अमेरिकेसोबत द्विपक्षिय सुरक्षा करारावर चर्चेदरम्यान अमेरिकेच्यावतीनं काही माहिती शेअर करण्यात आली होती. ज्यामध्ये संगठित गुन्हे, दहशतवाद आणि कट्टरपंथियांमध्ये युती असल्याची माहिती दिली. (Global News)

या सूचनांना आम्ही अत्यंत गांभीर्यानं घेतो त्यामुळेच एक उच्चस्तरीय समिती नेमून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. चौकशीत समोर आलेल्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. अमेरिकत दाखल प्रकरणात भारतीय अधिकाऱ्याचा उल्लेख होणं हे चिंताजनक आहे.

कॅनडाबाबत बोलायचं झाल्यास आम्ही यापूर्वीच सांगितलं आहे की, कॅनडात भारतविरोधी कट्टरपंथियांना आश्रय देण्यात आला आहे, तसेच हा महत्वाचा मुद्दा आहे. कॅनडात आमच्या राजदुतांना टार्गेट केलं जात आहे. आमची इच्छा आहे की कॅनडानं व्हिएन्ना कराराच्या अटी-शर्तींचं पालन करावं. कॅनडाचे राजदूत आमच्या अंतर्गत विषयांमध्ये दखल देत आहेत, हे कदापी स्विकारार्ह नाही. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT