Justin Trudeau eSakal
ग्लोबल

Justin Trudeau : अखेर जस्टिन ट्रुडो नरमले! म्हणाले, 'भारत एक वाढती आर्थिक शक्ती, आम्ही घनिष्ठ संबंध ठेवण्यासाठी प्रतिबद्ध'

India-Canada Dispute : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर गंभीर आरोप केले होते.

Sudesh

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर गंभीर आरोप केले होते. यानंतर भारताने कॅनडाला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. भारताचा हा पवित्रा पाहून ट्रुडो अखेर नरमले आहेत. भारत एक वाढती आर्थिक शक्ती असून, आम्ही भारताशी घनिष्ठ संबंध ठेवण्याबाबत प्रतिबद्ध आहोत असं ते म्हणाले.

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची कॅनडामध्ये हत्या झाली होती. यामध्ये भारताचा हात असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केला होता. यानंतर भारत-कॅनडा या दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, आता ट्रुडो यांनी नमती भूमिका घेत आपण भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करु, असं म्हटलं आहे.

गुरुवारी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ट्रुडो यांनी हे मत व्यक्त केलं. ते म्हणाले, "भारत एक वाढती आर्थिक शक्ती, आणि महत्त्वाचा भू-राजकीय देश आहे. गेल्या वर्षी आम्ही सादर केलेल्या इंडो-पॅसिफिक नीतीप्रमाणे आम्ही भारतासोबत घनिष्ठ संबंध ठेवण्याबाबत गंभीर आहोत."

"सोबतच, भारतानेही या (निज्जर हत्या) प्रकरणाच्या तपासात कॅनडाला संपूर्ण सहकार्य करावं हेदेखील मी याठिकाणी स्पष्ट करू इच्छितो" असंही ते पुढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT