Israel-Hamas War Esakal
ग्लोबल

Israel Vs Hamas: इस्राइलचे गाझावरचे हल्ले सुरूच; गाझा पट्टीची केली अक्षरशः चाळण

सकाळ डिजिटल टीम

Israel Vs Hamas: इस्त्राईलने गाझापट्टीत जमिनीवरून थेट लष्करी कारवाईला वेग दिला असून शनिवारी रात्रभर येथे इस्त्रायली रणगाडे अक्षरशः आग ओकत होते. या हल्ल्यामुळे गाझापट्टीत वीज पुरवठा आणि इंटरनेट सेवा देखील ठप्प झाली असून वीस लाखांपेक्षाही अधिक लोकांशी कोणताही संपर्क प्रस्थापित होऊ शकलेला नाही. इस्त्राईलच्या लढाऊ विमानांनी गाझाच्या जमिनीखालील 'हमास'च्या दहशतवाद्यांची तब्बल दीडशे ठाणी उद्ध्वस्त केल्याचे कळते.

गाझावर पूर्ण हल्ला करण्याची योजना इस्राईलच्या लष्कराने आखली असून कोणत्याही स्थितीमध्ये 'हमास' च्या दहशतवाद्यांचा बिमोड करायचाच असा निर्धार इस्त्रायली लष्कराकडून करण्यात आला आहे.

शनिवारी रात्रभर गाझापट्टीवर बाँबहल्ले सुरू राहिल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण होते. पॅलस्टाईनमध्ये दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या 'पाल्टेल' या समूहाने इस्राईलच्या बाँबहल्ल्यामुळे गाझातील इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा पूर्णपणे बंद झाल्याचे सांगितले. ही दूरसंचार सेवा बंद झाल्यामुळे मृतांचा आणि जखमींचा आकडा देखील आपल्याला पूर्णपणे समजू शकणार नाही, असे सूत्रांकडून सांगल्यात आले.

हमासचा हवाईदलप्रमुख ठार झाल्याचा दावा

इस्राईल आणि हमास यांच्यातील संघर्षाचा आजचा २२ वा दिवस होता. आमच्या लष्करी कारवाईमध्ये 'हमास'च्या हवाईदलाचा प्रमुख इस्साम अबू रुकबेह याला ठार मारण्यात यश आल्याचे इस्रायली लष्कराकडून सांगण्यात आले. 'हमास ने ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या हवाई हल्ल्यामागे रुकबेह याचाच हात असल्याचा आरोप केला जातो. पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून दहशतवादी इस्राईलमध्ये उतरले होते, या हल्ल्याचे पूर्ण नियोजन रुकबहने आखले होते.

लोकांची उपासमार

गाझापट्टीतील वीज पुरवठा ठप्प झाल्याने येथे अंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घरातील खाद्यपदार्थ आणि अन्नधान्य देखील संपुष्टात आल्याने लोकांची उपासमार होऊ लागली आहे. अनेकांनी पॅलेस्टाईनमधून गाझातील नागरिकांशी दूरध्वनीवरून संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण त्यातही त्यांना अपयश आले. गाझामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप विविध मानवाधिकार संघटनांकडून करण्यात आला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT