ग्लोबल

Lebanon Blast: लेबनानमध्ये बॉम्बस्फोट, इराणच्या राजदूतासह एक हजार जण जखमी, खिशात ठेवलेल्या पेजर्सने...

लेबनानने याबाबत माहिती देताना सांगितलं की, मंगळवारी दुपारी हिजबुल्लाहचे शेकडो समर्थक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांची माहिती अद्याप मिळालेली नाही. सांगितलं जातंय की, संपर्कासाठी त्यांच्याकडून पेजर्सचा उपयोग केला जात होता आणि अचानक पेजर्सचा स्फोट झाला.

संतोष कानडे

नवी दिल्लीः लेबनानमध्ये एक बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. पेजर्सच्या माध्यमातून ब्लास्ट करण्यात आलेला आहे. या घटनेमध्ये एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये हिजबुल्लाहचे सैनिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या भीषण घटनेत इराणचे राजदूत मोजीतबा अमानी जखमी झाले आहेत. इराणच्या मेहर समाचार एजन्सीने याबाबत माहिती दिलीय.

लेबनानने याबाबत माहिती देताना सांगितलं की, मंगळवारी दुपारी हिजबुल्लाहचे शेकडो समर्थक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांची माहिती अद्याप मिळालेली नाही. सांगितलं जातंय की, संपर्कासाठी त्यांच्याकडून पेजर्सचा उपयोग केला जात होता आणि अचानक पेजर्सचा स्फोट झाला.

हा साखळी बॉम्बस्फोट लेबनानच्या दक्षिण भागात आणि राजधानी बेरुतसह अनेक ठिकाणांवर झाला. हिजबुल्लाहच्या इतिहासातली ही मोठी चूक समजली जातेय. स्थानिक वेळेनुसार हा स्फोट ३.४५ वाजता झाला. एकानंतर एक असे अनेक ब्लास्ट झाले. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली.

सोशल मीडिया आणि लेबनानीसह इस्रायली मीडियावर प्रसिद्ध होत असलेले फोटो भीषण आहेत. जमीनवर पडलेले जखमी लोक दिसत आहेत. स्फोटानंतर रुग्णालयामध्ये मोठी गर्दी झाली होती. स्थानिक रुग्णालयामधील परिस्थिती हाताबाहेर गेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT