एका झटक्यात झाला पंधरा 'तो' 15 करोडचा मालक Google
ग्लोबल

नशीब फळफळले : एका झटक्यात झाला 'तो' 15 करोडचा मालक

सकाळ डिजिटल टीम

आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे अशी म्हण आपण लहान पणापासून ऐकत आलो आहोत. हिच म्हण मॅरीलॅंडमध्ये एका व्यक्तीच्या बाबतीत खरी झाली आहे. झटक्यात तो पंधरा करोडचा मालक झाला आहे. मानसाचे नशिब कधी उजळेल काही सांगता येत नाही. काही लोकांच्या नशीबात एक लाॅटरी नाही लागत तर काही लोकांच्या नशिबात पुन्हा पुन्हा लाॅटरी लागते. मॅरीलॅंडमध्ये एका व्यक्तीला बार स्क्रॅच आॅफ लाॅटरीतून दोन मिलियन डाॅलर (१४कोटी ९५लाख ४४ हजार) रूपये जॅकपाॅट लागला आहे.

बर्याच लोकांना लाॅटरी काढायची हौस असते. एक नाही अनेक वर्ष लोक लाॅटरी काढत असतात. एक ना एक दिवस करोडपती होण्याचे स्वप्न ते पाहत असतात. यातून अनेकदा निराशा पदरी पडते. पण यातून मात करत अनेकजण हा छंद जोपासत असतात.

सॅलिबरीने मॅरीलॅंड लाॅटरीचे अधिकारींच्या माहितीनुसार,पासष्ठ वर्षाच्या एका व्यक्तीने उत्तर सॅलिबरी स्टेशनवर डाॅलर रिचर स्क्रॅच तिकिट खरेदी केले. पहिले तिकिट स्क्रॅच केल्यावर त्याला शंभर डाॅलर मिळाले. दूसरे जेव्हा तिकिट स्क्रॅच केले तेव्हा त्याला स्व:तवर विश्वास बसला नाही. कारण यावेळी त्याला दोन मिलियन डाॅलरची लाॅटरी लागली.

विजेत्याने सांगितले कि, कोरोना महामारीत मी तिकिट खरेदी केले. पण हे तिकिट मला किती लाभदायक ठरेल याची शंकाच होती. जस जसे तिकिटाचा संपण्याचा कालावधी जवळ आला तशी भिती वाटायला लागली. पण जेव्हा मी कार्ड स्क्रॅच केले तेव्हा मला विश्वास बसला नाही. त्याने एकदम दोन लाॅटरी खरेदी केल्या होत्या.

लाॅटरी लागल्यानंतर या व्यक्तीने सांगितले की,कोणताही खेळ खेळत असताना निराशावादी होऊ नका. जॅकपाॅटसाठी खेळू नका. यातून तुम्हाला कसा आनंद घेता येईल ते पहा. मला पंधरा करोड रूपये मिळाले आहेत. या पैशाने मी परीवारासहित पर्यटनाला जाणार आहे. शिवाय माझे घर सुंदर बनवणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT