ग्लोबल

सुटका मोहिमेची डेडलाईन पाळा; तालिबानने अमेरिकेला पुन्हा धमकावलं

सकाळ डिजिटल टीम

काबूल : अफगाणिस्तानातील नागरिकांच्या सुटका मोहिमेवरून तालिबानने अमेरिकेला पुन्हा धमकावले असून ३१ ऑगस्टच्या अखेरपर्यंत ही मोहीम संपवावी असा सूर त्यांनी आळवला आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेसह अन्य देशांचे हजारो नागरिक आणि सैनिक अडकून पडले असून त्यांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेने ही सुटका मोहीम तातडीने संपवावी अशी धमकी तालिबानकडून देण्यात आली आहे. याबाबत बोलताना अमेरिकी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की ‘‘युरोपीय नेत्यांकडून जास्तीचा वेळ मागितला जात असला तरीसुद्धा या सुटका मोहिमेबाबतच्या डेडलाइनसाठी बायडेन कटिबद्ध आहेत.’’ ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सात देशांचा समूह तालिबानला कधीही मान्यता देणार नसल्याचे म्हटले आहे. यासाठी त्यांनी तालिबानने नागरिकांच्या सुटका मोहिमेमध्ये अडथळे आणू नयेत अशी अट घातली आहे. अमेरिकी गुप्तचरसंस्था ‘सीआयए’ने मध्यंतरी तालिबानी नेतृत्वाची काबूलमध्ये भेट घेऊन चर्चाही केली होती. यावरूनच ही सुटका मोहीम अमेरिकेच्या दृष्टीने किती महत्त्वपूर्ण आहे हे दिसून येते.

नंतर एकालाही बाहेर पडू देणार नाही

काबूल विमानतळाबाहेरील गर्दी वाढत असल्याने अमेरिकेच्या चिंता वाढल्या आहेत. अनेकवेळा गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अमेरिकेला गोळीबार देखील करावा लागला. तालिबानचा प्रवक्ता झबीउल्लाह मुजाहिदने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, की ‘‘ अमेरिकेने सुटका मोहिमेची डेडलाईन पाळणे गरजेचे आहे. ही मुदत संपुष्टात आल्यानंतर आम्ही एकाही नागरिकाला येथून बाहेर पडू देणार नाही.’’ विमानतळाबाहेरील गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीवर देखील निर्बंध आणण्याचा त्यांचा विचार आहे. सध्या काबूल विमानतळावरील हवाई वाहतूक हाताळण्याचे काम हे अमेरिकी आणि ‘नाटो’च्या तुकड्यांकडून केले जात आहे. १६ ऑगस्ट रोजी येथील सुटका मोहीम सुरू झाल्यानंतर या विमानतळावरून एकाही व्यावसायिक विमानाने उड्डाण केलेले नाही. अमेरिकेची येथील मोहीम संपुष्टात आल्यानंतर तालिबान या विमानतळाचा ताबा घेणार आहे. व्यावसायिक उड्डाणाबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

तालिबानी सहकार्यावर मोहीम अवलंबून : बायडेन

अफगाणिस्तानातील सुटका मोहीम अमेरिका ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करेल, त्यानंतर येथे लष्कर ठेवण्याचा आमचा कोणताही विचार नाही. ही सुटका मोहीम देखील तालिबान्यांच्या सहकार्यावर अवलंबून असेल असे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. काबूलमधील हमीद करझाई विमानतळावर अमेरिकेचे ५ हजार ८०० सैनिक तैनात आहेत. ही मोहीम लवकरात लवकर संपुष्टात आणण्याचा आमचा इरादा असून प्रत्येक दिवशी येथील धोका वाढत असल्याचे बायडेन यांनी व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT