Narendra Modi Vladimir Putin Narendra Modi Vladimir Putin
ग्लोबल

Modi-Putin Talk: PM मोदी, पुतिन यांच्यात फोनवरुन चर्चा; 'या' महत्वाच्या विषयावर झाली चर्चा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी PM मोदींना फोन करुन सविस्तर चर्चा केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाल्याचं वृत्त आहे. पुतिन यांनी मोदींना फोन करुन विविध विषयांवर चर्चा केल्याचं पुतिन यांच्या निवासस्थान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. (Modi Putin telephonic talk there was a discussion on important bilateral topics)

महत्वाची वेळ साधली

पुतिन यांचा फोन अशा वेळेस आला आहे जेव्हा PM मोदी नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावरुन देशात परतले आहेत. रशिया आणि अमेरिकेमध्ये देखील तणावाचं वातावरण असल्याच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमधील फोनवरील संभाषणावरुन विविध तर्क वितर्क वर्तवले जात आहेत. यापूर्वी पुतिन यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात भारत-रशिया द्विपक्षीय संबंधांवर मोकळेपणानं भाष्य केलं होतं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खूपच कौतुक केलं होतं.

कोणत्या विषयावर झाली चर्चा?

मोदी आणि पुतिन यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये युक्रेन युद्ध आणि वॅगनरच्या बंडाच्या मुद्यावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. क्रेमलिन यांनी सांगितलं की, २४ जूनच्या घटनांबाबत PM मोदींनी रशियातील कायदा-सुव्यवस्था, देशातील स्थिरता आणि रशियन नागरिकांच्या सुरक्षेसाठी रशियानं उचललेल्या पावलांचं समर्थन केलं होतं.

दरम्यान, द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा करताना दोघांनी महत्वाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा केली. दोघांनी २०२२ आणि यंदाच्या तिमाहीत दोन्ही देशांमधील व्यापार वृद्धीवर समाधान व्यक्त केलं. शांघाई सहकार्य संघटन आणि जी २० याच्यासोबत ब्रिक्सच्या प्रारुपाबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. याशिवाय पंतप्रधान मोदींनी आपल्या अमेरिकेच्या दौऱ्याबाबतही पुतिन यांच्यासोबत चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Chenab Bridge : आयफेल टॉवरप्रमाणे चिनाब पुलाचेही घेता येणार विहंगम दर्शन!

Navratri Diet Tips for Fast: नवरात्रीत उपवासाचे पदार्थ खाताय? पचन चांगलं ठेवण्यासाठी आहारात वाढवा 'हे' पोषणतत्त्व

SCROLL FOR NEXT