Nepal Landslides wash away two buses in Trishuli River, 63 missing  Esakal
ग्लोबल

Nepal Bus: भूस्खलनामुळे त्रिशूली नदीत दोन बस वाहून गेल्या, 63 जण बेपत्ता

Nepal Rain: सततच्या पावसामुळे बेपत्ता बसेसचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, खराब हवामानामुळे काठमांडू ते भरतपूर, चितवन येथील सर्व उड्डाणे आजसाठी रद्द करण्यात आली आहेत.

आशुतोष मसगौंडे

खराब हवामान नेपाळमधील लोकांसाठी मोठे संकट ठरत आहे. आज म्हणजेच शुक्रवारी सकाळी मध्य नेपाळमधील मदन-आशीर महामार्गावर भूस्खलनामुळे सुमारे 63 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

या दोन्ही बसमधील सर्व प्रवाशी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. चितवनचे मुख्य जिल्हा अधिकारी इंद्रदेव यादव यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार दोन्ही बसमध्ये चालकांसह एकूण 63 जण प्रवास करत होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. आम्ही घटनास्थळी आहोत आणि शोध मोहीम सुरू आहे.

सततच्या पावसामुळे बेपत्ता बसेसचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, खराब हवामानामुळे काठमांडू ते भरतपूर, चितवन येथील सर्व उड्डाणे आजसाठी रद्द करण्यात आली आहेत.

जिल्हाधिकारी म्हणाले की, स्थानिक प्रशासन आणि मदत कर्मचारी घटनास्थळी आहेत आणि शोध मोहीम सुरू आहे. संततधार पावसामुळे बेपत्ता बसेसच्या शोधात अनेक आव्हाने समोर येत आहेत.

दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी ट्विट केले की, "नारायणगड-मुग्लिन मार्गावरील भूस्खलनात बस वाहून गेल्याने सुमारे 63 प्रवासी बेपत्ता झाल्याच्या वृत्तामुळे मला खूप दुःख झाले आहे. मी गृह प्रशासनासह सरकारच्या सर्व यंत्रणांना प्रवाशांचा शोध आणि प्रभावी बचाव करण्याचे निर्देश दिले आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT