Nikhil Gupta Sakal
ग्लोबल

Nikhil Gupta : निखिल गुप्ता अमेरिकेच्या तुरुंगात; लवकरच न्यायालयात हजर करणार

Gurpatwant Pannun murder plot: गुप्ता याला दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेत आणण्यात आले असून तो सध्या ब्रुकलिन येथील तुरुंगात आहे.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंतसिंग पन्नून याची अमेरिकेत हत्या करण्याचा कट रचून त्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप असलेल्या निखिल गुप्ता या भारतीय नागरिकाला चेक प्रजासत्ताकाने आज अमेरिकेच्या ताब्यात दिले.

गुप्ता याला मागील वर्षी अमेरिकेच्याच विनंतीवरून चेक प्रजासत्ताक देशात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या हस्तांतराची अमेरिकेने केलेली मागणी मान्य झाली होती. अमेरिकेकडे हस्तांतर करण्याविरोधात गुप्ता याने याचिका केली होती.

ही याचिका मागील महिन्यात फेटाळण्यात आली होती. गुप्ता याला दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेत आणण्यात आले असून तो सध्या ब्रुकलिन येथील तुरुंगात आहे. त्याला लवकरच न्यूयॉर्क येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांचा नागरिक असलेल्या पन्नून याच्या हत्येचा कट रचल्याचा आणि त्यामध्ये भारतीय व्यक्तीचा हात असल्याचा अमेरिकेचा आरोप होता.

निखिल गुप्ता याने पन्नून याला मारण्यासाठी भाडोत्री गुंडांना १५ हजार डॉलर आगाऊ रक्कमही दिल्याचे अधिक तपासानंतर स्पष्ट झाल्यानंतरच त्याच्या अटकेची विनंती चेक प्रजासत्ताकला करण्यात आल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले. गुप्ता याने भारत सरकारच्या एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरूनच हा कट रचल्याचा आरोप अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केला असून हा आरोप भारताने वारंवार नाकारला आहे.

भारतालाही पत्र

निखिल गुप्ता याने भारतातील सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहिले आहे. हत्येच्या कटाचा आणि आपला कोणताही संबंध नसून आपल्याला अन्यायाची वागणूक मिळत आहे, असा दावा गुप्ता याने पत्रात केल्याचे त्याच्या वकील रोहिणी मुसा यांनी माध्यमांना सांगितले. तसेच, अमेरिकी तपास संस्थांच्या दबावामुळे चेक प्रजासत्ताकमधील वकीलांनी गुप्ता याला दिशाभूल करणारा सल्ला देत अडकविले, असा आरोपही मुसा यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT