Omicron variant Sakal media
ग्लोबल

ओमिक्रॉनमुळे लसीचा प्रभाव कमी - WHO

सकाळ डिजिटल टीम

सध्या जगावर ओमिक्रॉन (Omicron Variant) या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे संकट आहे. भारतात देखील या व्हेरियंटचे ३८ रुग्ण सापडले आहेत. या व्हेरियंटची संक्रमणाची क्षमता (Omicron Transmission Rate) ही डेल्टा व्हेरियंटपेक्षा जास्त असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

संसर्ग आणि संक्रमणाविरोधातील लसीचा प्रभाव ओमिक्रॉनमुळे कमी होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितल्यांचं वृत्त एएफपीनं दिलं आहे. तसेच सध्या उपलब्ध असलेल्या माहितीवरून ओमिक्रॉनची रुग्णसंख्या ही डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक असेल. ओमिक्रॉनमुळे लसीचा प्रभाव कमी होत असला तरीही ओमिक्रॉनची लक्षणे सौम्य असल्याचे एफपीने जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देत म्हटलं आहे.

दक्षिण आफ्रिकेने 24 नोव्हेंबर रोजी डब्ल्यूएचओला ओमिक्रॉनबाबत माहिती दिली होती. त्यानंतर अनेक देशांमध्ये या नव्या व्हेरियंटने शिरकाव केला आहे. दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचे जास्त रुग्ण आढळून येत आहे. मात्र, सध्या अपुरी माहिती असल्यामुळे त्याचा संक्रमण दर निश्चित केला जाऊ शकत नाही, असंही डब्ल्यूएचओचं म्हणणं आहे.

भारतात ओमिक्रॉची रुग्णसंख्या -

आज केरळमध्ये देखील ओमिक्रॉनने शिरकाव केला असून एक रुग्ण आढळून आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, राजस्थान, चंदीगढ, दिल्ली आणि केरळ या राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून रविवारीच नागपुरात एक रुग्ण आढळून आला आहे. भारतातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या आता ३८ वर पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: निधी नसेल तर सिगारेट अन् दारूवर कर लावा, पण... सुनावणीच्या मध्येच सरन्यायाधीश का संतापले?

सोनम वांगचुकना हटवण्यासाठी ३० सेकंदाचा प्लॅन, पहाटे ३ पासून हालचाली; साध्या वेशात पोलीस, चादरीचा पडदा लावून उचललं

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतरवर अमित ठाकरेंची हजेरी; अभिजीत दिपकेंची घेतली भेट

FDA: तुकाराम मुंढेंचा प्रहार! बदलापुरात मोठी कारवाई, दोन टपऱ्या सील; भेसळखोरांसह अंमली पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले

ODI World Cup Format: वर्ल्ड कपच्या नव्या फॉरमॅटला विरोध! ICC विरोधात चार देश उभे राहिले, WCA चे पाठबळ मिळाले; कोणासाठी केला जातोय बदल? थेट सवाल

SCROLL FOR NEXT