Representative image Team eSakal
ग्लोबल

मशिदीत पाणी आणण्यासाठी गेलेल्या हिंदू कुटुंबावर पाकिस्तानात अत्याचार

पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाशी संबंधीत लोकांनी अत्याचार केल्याचा कुटुंबाचा आरोप

सुधीर काकडे

पाकिस्तानमध्ये (Pakistan) राहणाऱ्या अल्पसंख्यांक हिंदू कुटुंबांवर (Hindu Family in Pakistan) होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत असतात. पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली असून, पंजाब प्रांतामध्ये मशिदीतून पिण्याचे पाणी आणल्याने एक हिंदू कुटुंबाला आता जाच सहन करावा लागतो आहे. अल्पसंख्यांक हिंदू समाजातील कुटुंबाला प्रार्थनास्थळाचे पवित्रेला डाग लावल्याचा आरोप करत त्रास दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

पंजाबच्या रहिमयार खान शहरातील रहिवासी आलम राम भील आपल्या पत्नीसह कुटुंबातील इतर सदस्यांसह शेतात कापूस वेचत होते. मशिदीमधून पिण्याचे पाणी आणल्यानंतर या कुटुंबाला मशिदीच्या पावित्र्याचे उल्लंघन केले, असे म्हणत त्रास दिला जातो गेला. कुटुंबाला त्रास देताना स्थानिकांनी या हिंदु कुटुंबाला डांबून ठेवल्याचा प्रकार टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तामधून समोर आला आहे. भील म्हणाले की, जेव्हा आमचे कुटुंब जवळच्या मशिदीबाहेर नळाचे पाणी आणण्यासाठी गेले तेव्हा काही स्थानिक लोकांनी त्यांना मारहाण केली. डॉन वृत्तपत्राने या घटनेचे वृत्त दिले आहे. एवढ्यावरच न थांबता काम करुन घरी जाणाऱ्या कुटुंबाला स्थानिक जमीनदारांनी डांबून ठेवत त्यांच्यावर अत्याचार केले.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, संबंधीत लोक हे पाकिस्तानचे पंतप्रधना इम्रान खान यांच्या तेहरीक ए इन्साफ पक्षाशी संबंधीत असल्याचे या कुटुंबाना सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mankhurd Accident: सायन-पनवेल महामार्गावर बेस्ट बसचा भीषण अपघात; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू,५ जण जखमी

Harishchandragad Landslide: हरिश्चंद्रगडावर मुसळधार पावसात दरड कोसळली; चार पर्यटक जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक, स्थानिकांची तत्परता..

Latest Marathi Update : जंतर मंतरवर दगडांचे डंपर, आंदोलकांना अडकवण्यासाठी षडयंत्र - दीपकेचा आरोप

Koyna Dam Water Level Today : कोयना धरण 60 टक्क्यांच्या उंबरठ्यावर; महाबळेश्वर खोऱ्यातही पावसाची जोरदार बॅटिंग, 24 तासांत 2.35 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ

Fifa World Cup Final : स्पेनने १६ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला, पण त्यांना खरी ट्रॉफी मिळालीच नाही; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली ट्रॉफी नकली होती? नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT