Nawaz Sharif 
ग्लोबल

Nawaz Sharif: पाकिस्तान भीकेला कशामुळे लागला? भारत नाही, तर... नवाज शरीफ सत्यच बोलले

जेव्हा लष्करी हुकूमशाह संविधानाचे उल्लंघन कतात तेव्हा न्यायाधीश त्यांना माळ घालतात, त्यांचा निर्णय वैध ठरवतात.

कार्तिक पुजारी

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी देशाच्या दुरावस्थेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानच्या सध्याच्या हलाकीच्या स्थितीसाठी भारत किंवा अमेरिका जबाबदार नाही. तर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे, असं शरीफ म्हणाले. पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. (Pakistan former prime minister Nawaz Sharif said neither India nor the US were behind the cash strapped country)

शरीफ म्हणाले की, त्यांना १९९३, १९९९ आणि २०१७ मध्ये तीनवेळा सत्तेतून हटवण्यात आलं. देशाच्या दुरावस्थेसाठी आपण स्वत:च जबाबदार आहोत. आपल्याला भारत, अमेरिका किंवा अफगाणिस्तानकडे देखील बोट दाखवता येणार नाही. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

जेव्हा लष्करी हुकूमशाह संविधानाचे उल्लंघन कतात तेव्हा न्यायाधीश त्यांना माळ घालतात, त्यांचा निर्णय वैध ठरवतात. पण, जेव्हा प्रधानमंत्री असं काही करतो तेव्हा त्यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला जातो. न्यायमूर्ती संसद विसर्जित करण्याला देखील मंजूरी देतात. असं का? असा प्रश्न शरीफ यांनी केला.

शरीफ यांना २०१७ मध्ये पदच्च्यूत व्हावं लागलं होतं. त्यांच्यावर ही वेळ त्यावेळचे लष्कर प्रमुख फैज हामिद यांच्यामुळे आली होती. यावरुन ते म्हणाले की, त्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ते म्हणाले होते की नवाज तुरुंगाबाहेर आले तर त्यांची दोन वर्षांची मेहनत वाया जाईल.

पुढील वर्षाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवाज शरीफ आपले चार वर्षाचे निर्वासित आयुष्य संपवून लंडनमधून परत आले आहेत. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचे प्रमुख इमरान खान यांचा उल्लेख करत म्हटलं की, आपल्या मर्जीतल्या व्यक्तीला पदावर आणता यावे यासाठी लष्कराने मला पदावरुन हटवलं.

दरम्यान, मागील आठवड्यात शरीफ यांना अल-अजिजिया स्टिल मील भ्रष्टाचार प्रकरणात निर्दोष ठरवण्यात आलंय. एवेनफ्लील्ड भ्रष्ट्राचार आणि फ्लॅगशीप प्रकरणातही त्यांना दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT