pm imran khan pm imran khan
ग्लोबल

पाकिस्तान : महागाईचा भडका; पेट्रोल पहिल्यांदाच होणार १५० रुपये लीटर

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद - पाकिस्तान (Pakistan) गेल्या काही काळापासून महागाईचा सामना करत आहे. आता पाकिस्तानात पेट्रोल (Petrol) दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता आहे. पाकिस्तान मीडिया न्यूज इंटरनॅशनलने दिलेल्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) किंमतीमध्ये ५ रुपये प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या वाढत्या किंमतीचा भार ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला गेल्यास १६ फेब्रुवारीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती १३ ते १५ रुपये प्रति लीटर वाढण्याची शक्यता आहे.

द न्यूज इंटरनॅशनलच्या वृत्तानुसार, सध्या पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर १४७.८३ रुपये प्रति लीटर इतका आहे. तर हायस्पीड डीझेल १४४.६२ रुपये प्रति दराने विक्री होत आहे. याआधी पाकिस्तानचे अर्थमंत्री शौकत तारिन यांनी पेट्रोलियम किंमती वाढण्याचे संकेत दिले होते. ते म्हणाले होते की, पाकिस्तानात इम्रान खान यांचे सरकार इंधन दरांना कमी ठेवू शकत नाही.

तारिन यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या १५ दिवसांसाठी इंधन दर स्थिर ठेवण्याच्या निर्णयाविरोधात मत व्यक्त केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, निर्णय लोकांसाठी चांगला असला तरी हे फार काळ चालणार नाही. येत्या वर्षाच्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, सरकारसमोर हे एक आव्हान आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार पुढचा अर्थसंकल्प सादर करताना दबावाखाली असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT