Death Penalty esakal
ग्लोबल

Death Penalty: जगामध्ये सर्वात जास्त मृत्यूदंड देणारा मुस्लिम देश; भारताचा शेजारी, सौदीलाही मागे टाकलं

Latest Marathi News: लाहोर येथील बिगर सरकारी संघटनेने २२व्या विश्व मृत्यूदंडविरोधी दिवशी आपला वार्षिक अहवाल प्रकाशित केला. ज्याचं शीर्षक 'पाकिस्तानातील मृत्यूदंडः मृत्यूदंडाच्या माहितीचं विश्लेषण' असं आहे. अशा प्रकारच्या कैद्यांची सर्वात जास्त संख्या पंजाब प्रांतात आहे. २ हजार ५०५ इतकी ती संख्या आहे. त्यानंतर २ हजार ३११ कैदी खैबर पख्तूनख्वा प्रांतात आहेत.

संतोष कानडे

Death Penalty Reports: जगामध्ये सर्वात जास्त मृत्यूदंडाची शिक्षा देणाऱ्या देशामध्ये सैदी अरेबियाचा वरचा नंबर होता. परंतु आता या यादीमध्ये भारताच्या शेजारील देशाचा वरचा क्रमांक लागला आहे. सर्वात जास्त मृत्यूदंडाची शिक्षा देणारा देश म्हणून या देशाची नोंद झालीय.

पाकिस्तान हा सर्वात जास्त मृत्यूदंड देणाऱ्या देशांमध्ये सहभागी झालाय. जागतिक स्तरावर मृत्यूच्या शिक्षेचा सामना करणाऱ्या कैद्यांमध्ये २६ टक्के कैदी पाकिस्तानी आहेत. एका बिगर सरकारी संघटनेद्वारे गुरुवारी जारी करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे.

जेपीपी अर्थात कायदेशीर कार्यवाही संघटना जस्टिस प्रोजेक्ट पाकिस्तानने आपला वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये म्हटलंय की, २०२४मध्ये एकूण ६ हजार १६१ कैद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. तर २०२३ मध्ये हा आकडा ६ हाजर ३९ इतका होता. २०२० मध्ये मृत्यूच्या शिक्षेचा सामना करणाऱ्या कैद्यांची संख्या ३ हजार २२६ इतकी होती.

लाहोर येथील बिगर सरकारी संघटनेने २२व्या विश्व मृत्यूदंडविरोधी दिवशी आपला वार्षिक अहवाल प्रकाशित केला. ज्याचं शीर्षक 'पाकिस्तानातील मृत्यूदंडः मृत्यूदंडाच्या माहितीचं विश्लेषण' असं आहे. अशा प्रकारच्या कैद्यांची सर्वात जास्त संख्या पंजाब प्रांतात आहे. २ हजार ५०५ इतकी ती संख्या आहे. त्यानंतर २ हजार ३११ कैदी खैबर पख्तूनख्वा प्रांतात आहेत.

जेपीपीच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान हा देश मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावणाऱ्या देशांपैकी एक आहे. जागतिक स्तरावर मृत्यूच्या शिक्षेचा सामना करणाऱ्या कैद्यांमध्ये २६ टक्के पाकिस्तानात आहेत.

JPP रिपोर्टमध्ये म्हटलंय की, पाकिस्तानमध्ये मृत्यूदंड दिलेल्या कैद्यांची टक्केवारी संपूर्ण विश्वात १३ टक्के इतकी आहे. संघटनेच्या रिपोर्टनुसार २००४ पासून आतापर्यंत पाकिस्तानात कमीत कमी ४ हजार ५०० लोकांना मृत्यूदंड देण्यात आलेला आहे. म्हणजे सरासरी प्रत्येक दिवशी एका व्यक्तीला मृत्यूची शिक्षा दिली जाते. पाकिस्तानने आकडेवारीमध्ये सैदी अरेबियालाही मागे टाकलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT