court  sakal media
ग्लोबल

आपणचं पैगंबर असल्याचा महिलेचा दावा; कोर्टानं सुनावला मृत्यूदंड!

संबंधीत महिला लहोरच्या एका खासगी शाळेत प्रिन्सिपल आहे.

सकाळ डिजिटल टीम

लाहोर : इस्लामचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांची निंदा केल्याप्रकरणी पाकिस्तानात एका महिला प्रिन्सिपलला कोर्टानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. तिच्यावर आरोप होता की, तिनं २०१३ मध्ये मुहम्मद पैगंबर यांना इस्लामचा पैगंबर मानण्यास नकार दिला होता. तसेच आपण स्वतः पैगंबर असल्याचा दावा केला होता. यानंतर लाहोर पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला होता.

लाहोरच्या निश्तर कॉलनी भागात राहणाऱ्या सलमा तन्वीर या व्यवसायानं एका खासगी शाळेत प्रिन्सिपल आहेत. जिल्हा कोर्टानं या महिलेविरोधात सुनावणी करताना तिला मृत्यूदंडाशी शिक्षा सुनावली तसेच तिला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

कोर्टानं फेटाळले सर्व दावे

आरोपी महिलेच्या वकिलानं कोर्टाला सांगितलं की, ही महिला मानसिकदृष्ट्या आजारी असून अशा प्रकारच्या विचित्र गोष्टी कायम बोलत असते. मात्र, या महिलेच्या वैद्यकीय अहवालात स्पष्ट झालंय की, ती पूर्णपणे बरी आहे. यानंतर कोर्टानं तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.

पाकिस्तानातील वादग्रस्त कायदा

पाकिस्तानात ईश्वर निंदा कायदा वादग्रस्त ठरला आहे. कारण या कायद्यांतर्गत कडक शिक्षेची तरतूद आहे. १९८७ पासून आत्तापर्यंत १४७२ जणांना ईश्वर निंदा केल्याचा आरोप पाकिस्तानात झाला आहे. विशेष म्हणजे या कायद्यांतर्गत आरोप झालेली व्यक्तीला खटला लढण्यासाठी योग्य वकीलही मिळत नाही. कारण यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांचे खटले घ्यायला कोणी वकील तयार होत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT