ग्लोबल

Jaish-e-Mohammed: मसूद अझहरच्या अटकेसाठी पाकिस्तानचे तालिबान सरकारला पत्र!

मसूद अझहर नांगरहार आणि कुनार भागात लपून बसल्याची शक्यता

अंकिता खाणे (Ankita Khane)

जैश-ए-मोहम्मदचा संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला अटक करण्यासाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानला पत्र लिहिले आहे. पाकिस्तानने आपल्या पत्रात म्हटले आहे की, मसूद अझहर नांगरहार आणि कुनार भागात लपून बसल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला शोधून अटक करावी अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. त्याचबरोबर मसूद अझहरची माहिती द्यावी असंही पाकिस्तानने या पत्रात म्हंटलं आहे.

जैश-ए-मोहम्मदचा संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला खरंच अटक करायच आहे की, 16 सप्टेंबरला होणाऱ्या उझबेकिस्तानची राजधानी समरकंद येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना म्हणजेच SEO बैठकीपूर्वी पाकिस्तान काही डावपेच आखत आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.

पाकिस्तानने ही भूमिका अशा वेळी घेतली आहे, जेव्हा पॅरिसस्थित आंतरराष्ट्रीय देखरेख संस्था फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे लिस्टमध्ये मसूद अझहरचा समावेश करण्यात आला आहे. अशा परीस्थितीत पाकिस्तानला दहशतवाद्यांवर कारवाईसारखी पावले उचलणे भाग पडले आहे. त्याच वेळी, FATF टीमने अलीकडेच पाकिस्तानला भेट दिली, ज्यामध्ये पाकिस्तानने दहशतवाद रोखण्यासाठी उचललेली पावले अपुरी असल्याचेही सांगण्यात आले आहे.

मसूद अझहरच्या अटकेची मागणी करत जगाच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचा हा पाकिस्तानचा प्रयत्न आहे अशीही चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

SCROLL FOR NEXT