Pakistan Police Clash With Pak Army Esakal
ग्लोबल

Pakistan Police Clash With Pak Army: पाकिस्तानी लष्कराचा पंजाब पोलिस स्टेशनवर हल्ला, अनेकांना बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Pakistan Police Clash With Pak Army: पाकिस्तानी लष्कराने पंजाब पोलिसांच्या पोलिस ठाण्यावर हल्ला केला. यावेळी अनेकांना बेदम मारहाण करण्यात आली, त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पाकिस्तानी लष्कर आपल्या अत्याचार आणि कारस्थानांमुळे कायमच चर्चेत असते. आज देशात जी राजकीय आणि आर्थिक अस्थिरता आहे, तीही लष्करामुळेच, असे अनेक पाकिस्तानींचे म्हणणे आहे. पाकिस्तानी लष्कराने आपल्याच पोलिसांवर केलेल्या अत्याचाराचे ताजे प्रकरण आता समोर आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये पाकिस्तानी लष्कराने पंजाब पोलिसांच्या एका पोलिस स्टेशनवर हल्ला केल्याचा दावा केला जात आहे.

पाकिस्तानी पत्रकार रऊफ लासरासह अनेकांनी X वर पोस्ट लिहून ही माहिती दिली आहे. मात्र, या व्हिडिओला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

लष्कराने पोलिसांना बेदम मारहाण केली. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, पोलिसांची चूक ही होती की, त्यांनी लष्करातील जवानाच्या भावाकडून अवैध शस्त्रे जप्त केले होते. यानंतर सैन्याने पोलिस ठाण्यावर हल्ला केला आणि जो कोणी मिळेल त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

या घटनेची माहिती देणारा पाकिस्तानी पत्रकार रऊफ लासराने X वर एक व्हिडिओ पोस्ट केल्यावर तो व्हायरल झाला. त्यांनी X वर लिहिले की, पंजाबमधील भवालनगर येथे मदारिसा पोलिस स्टेशन आणि लष्कराच्या जवानांमध्ये संघर्षाची बातमी आहे.

रऊफ लासरा पुढे म्हणाले की, गस्तीदरम्यान पोलिसांना लष्कराच्या कमांडोच्या भावाकडे अवैध शस्त्रे सापडली. यानंतर वाद सुरू झाला आणि त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना जवानांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

युजर्स सोशल मीडियावर लिहित आहेत की, ही बातमी व्हायरल झाल्यानंतर स्थानिक मीडियाला या घटनेचे वार्तांकन न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घटनास्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Live Update: भूमरेंच्या चालकाकडून अंबादास दानवेंवर एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Pune Fire News: पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, परिसरात धुराचे मोठे लोट

SCROLL FOR NEXT