PM Modi 
ग्लोबल

PM मोदी न्यूयॉर्कमध्ये दाखल; अमेरिकेचा पहिलाच राजकीय दौरा ठरणार खास! : PM Modi USA Visit

PM मोदींचा हा अमेरिकेचा पहिलाच अधिकृत राजकीय दौरा असून या दौऱ्यात अनेक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत, ते पहिल्यांदाच अमेरिकेच्या अधिकृत राजकीय दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान अनेक ठिकाणी अनेक मुद्द्यांवर पंतप्रधानांचा संवाद होणार आहे. यावेळी अमेरिका-भारत द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जाणार आहेत. (PM Modi arrives in New York on first leg of his official State visit to the United States)

तज्ज्ञांच्या घेणार भेटी

न्यूयॉर्कमधील दौऱ्यात पंतप्रधान मोदी अनेक तज्ज्ञ लोकांच्या भेटी घेणार आहेत. यामध्ये विविध कंपन्यांचे सीईओज, नोबेल पारितोषिक विजेते, अर्थतज्ज्ञ, कलाकार, वैज्ञानिक, स्कॉलर्स, उद्योजक, प्राध्यापक, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अशा अनेकांच्या भेटी ते घेणार आहेत. तसेच या लोकांच्या ज्ञानाचा फायदा भारताला कसा होईल याबाबतही चर्चा करणार आहेत. (Latest Marathi News)

'योग डे'ला लावणार हजेरी

त्यानंतर उद्या २१ जून रोजी PM मोदी संयुक्त राष्ट्रांच्या हेडक्वार्टरमध्ये 'योग डे'च्या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. (Marathi Tajya Batmya)

तीन दिवसांचा दौरा

दरम्यान, यापूर्वी परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी PM मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्याबाबत माहिती देताना सांगितलं होतं की, २१ ते २३ जून तीन दिवसांचा मोदींचा पहिलाच अधिकृत राजकीय दौरा असणार आहे. मोदींच्या या दौऱ्याची अधिकृत सुरुवात २१ जूनच्या सकाळी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमानं होणार आहे. या कार्यक्रमात अनेक बडे नेते हजेरी लावणार असून मोदी त्यांची भेट घेणार आहेत.

असा असणार कार्यक्रम

त्यानंतर PM मोदी वॉशिंग्टन डीसी इथं स्केलिंग ऑफ फ्युचर वर अधारित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच २१ जून रोजीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि PM मोदींमध्ये वैयक्तिक भेट होऊ शकते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २२ जून रोजी व्हाईट हाऊस या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी PM मोदींचं स्वागत होणार असून या ठिकाणी अमेरिका-भारत अशी द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे. त्यानंतर मोदी अमेरिकेच्या संसदेत संबोधितही करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT