PM Modi first foreign Head of govt to receive Bhutan highest civilian honour Order of the Druk Gyalpo marathi News  
ग्लोबल

Order of the Druk Gyalpo : PM मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान; आतापर्यंत १५ देशांनी केलाय गौरव

honour Order of the Druk Gyalpo : भूतानने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्यालपो' (Order of the Druk Gyalpo) से देऊन सन्मानित केलं आहे.

रोहित कणसे

PM Modi first foreign Head of govt to receive Bhutan highest civilian honour Order of the Druk Gyalpo : भूतानने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्यालपो' (Order of the Druk Gyalpo) से देऊन सन्मानित केलं आहे. भूतानचा हा सर्वोच्च नागरीक सन्मान आहे. पीएम मोदी हे हा सन्मान दिला जाणारे पहिले परदेशी नागरीक आहे.

हा पुरस्कार भूतानसाठी खूप महत्वाचा मानला जातो आणि समाजिक जीवनातील कार्य आणि योगदानाचे प्रतीक मानला जातो. हा पुरस्कार त्याची सुरूवात झाल्यापासून केवळ चार प्रतिष्ठित व्यक्तींना देण्यात आला आहे. पीएम मोदी यांना अतापर्यंत तब्बल १५ देशांनी आपल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे.

यापूर्वी भूतानचा हा पुरस्कार चार जणांना देण्यात आला आहे. यामध्ये २००८ साली भूतानच्या राणी दादी आशी केसांग चोडेन वांगचुक यांना तो देण्यात आला होता. तसेच हा सन्मान २००८ साली जे थ्रिजुर तेनजिन डेंडुर (भूतानचे ६८वे जे खेंपो) आणि २०१८ मध्ये जे खेंपो ट्रुलकु न्गावांग जिग्मे चोएद्रा यांना हा पुरस्कार मिळाला.

यादरम्यान पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर गेले आहेत. शुक्रवारी त्यांनी थिंपू येथे भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगतुक यांची भेट घेतली. त्यापुर्वी पंतप्रधान मोदी यांचं स्वगत केलं. पंतप्रधान मोदी दोन देशांमधील संबंध सदृढ करण्याच्या उद्देशाने भूतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ७०–८० वयातही शिकण्याची धडपड! महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे ‘आजीबाईंची शाळा’; व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल भावूक

नव्या नवरीवर भारी पडला जाऊबाईंचा तोरा! अनुष्कापेक्षा सुंदर दिसते तिची जाऊ; मेघनच्या वहिनीला पाहिलंत का?

Horoscope Prediction : उद्या तयार होतोय गजकेसरी राजयोग; मिथुन राशीबरोबर पाच राशींना लागणार जॅकपॉट !

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

SCROLL FOR NEXT