PM Modi US Visit four-day US tour begins opportunity to strengthen bilateral relations Joe Biden  sakal
ग्लोबल

PM Modi US Visit : पंतप्रधानांचा चार दिवसीय अमेरिका दौरा सुरू; द्विपक्षीय संबंधांच्या बळकटीची संधी

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी हे २१ जून ते २४ जून यादरम्यान अमेरिका दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीची खोली आणि वैविध्य अधिक दृढ करण्याची संधी मला अमेरिका दौऱ्यामुळे मिळणार आहे. दोन्ही देश म्हणून ठामपणे एकत्र राहिल्यास जगासमोर असलेल्या आव्हानांचा सामना करू शकू,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. मोदी आज चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले, तत्पूर्वी एका निवेदनाद्वारे त्यांनी दौऱ्याची जनतेला माहिती दिली.

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी हे २१ जून ते २४ जून यादरम्यान अमेरिका दौऱ्यावर असतील. त्यानंतर ते इजिप्तला जाणार असून तेथून भारतात परततील. अमेरिकेचा हा दौरा म्हणजे दोन लोकशाही देशांमधील भागीदारीतील मजबूती आणि चैतन्य यांचे प्रतिबिंब असल्याचे मोदी यांनी आपल्या निवेदनात सांगितले.

आपल्या अमेरिका दौऱ्याची सुरुवात न्यूयॉर्क येथून करणार असल्याची माहिती मोदी यांनी दिली. २१ जूनला संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सदस्यांसह मोदी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहेत. योग दिन जागतिक पातळीवर साजरा करण्याचा भारताचा प्रस्ताव जिथे मान्य झाला, त्या ठिकाणाला भेट देण्यास मी उत्सुक आहे, असे मोदी म्हणाले.

न्यूयॉर्कनंतर मोदी वॉशिंग्टनला जाऊन अध्यक्ष बायडेन यांची भेट घेणार आहेत. बायडेन आणि अमेरिकेच्या इतर वरीष्ठ नेत्यांबरोबरील चर्चेमुळे द्विपक्षीय सहकार्य, जी-२०, क्वाडसारख्या बहुपक्षीय व्यासपीठांवर सहकार्य बळकट करण्याची संधी मिळणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.

‘‘वस्तू आणि सेवा क्षेत्रात अमेरिका हा भारताचा सर्वांत मोठा भागीदार देश असून विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, संरक्षण व सुरक्षा क्षेत्रांत आमचे घनिष्ठ संबंध आहेत. नव्या तंत्रज्ञानामुळे संरक्षण औद्योगिक सहकार्य, अवकाश, दूरसंचार, क्वांटम, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये नवीन आयाम जोडले आहेत व सहकार्य वृद्धिंगत झाले,’’ असे मोदींनी सांगितले.

काही कार्यक्रम

  • बायडेन यांच्यासोबत

  • शासकीय मेजवानी

  • अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधन

  • भारतीय-अमेरिकी समुदायासमोर भाषण

  • ‘टेस्ला’चे प्रमुख एलॉन मस्क यांच्यासह प्रमुख उद्योगपतींबरोबर चर्चा

दिग्गजांशी करणार चर्चा

पंतप्रधान मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या मेजवानीला भारतीय वंशाच्या लोकप्रतिनिधींसह सत्य नाडेला (मायक्रोसॉफ्ट), सुंदर पिचाई (गुगल) व राज सुब्रह्मण्यम (फेडएक्स) यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. न्यूयॉर्क येथे आल्यावर मोदी हे टेस्ला आणि ट्विटर कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क,

खगोलभौतिकशास्त्रज्ञ नील डिग्रासी टायसन आणि नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ पॉल रोमर यांनाही भेटणार आहेत. याशिवाय, लेखक निकोलस नसीम तालेब, गुंतवणूकदार रे डॅलिओ, फालु शहा, जेफ स्मिथ, मायकेल फ्रोमन, डॅनिएल रसेल, एल्ब्रीज कॉल्बी, पीटर आग्रे, स्टीफन क्लास्को आणि चंद्रिका टंडन यांच्याही मोदी चर्चा करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT