PM Modi US Visit  
ग्लोबल

PM Modi US Visit : नरेंद्र मोदी अमेरिकेत इलॉन मस्क यांना भेटणार, करणार 'ही' महत्त्वाची मागणी

Sandip Kapde

PM Modi US visit :  पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा २१ जूनपासून सुरू होणार असून २४ जून रोजी संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भेटीदरम्यान जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांची भेट घेणार आहेत.

टेस्ला भारतात कारखाना सुरू करण्याच्या प्रकल्पावर काम करत असल्याच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींची मस्कसोबतची बैठक होणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानल्या जात आहे.  PM Modi US visit

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत २४ लोकांना भेटणार आहेत. यामध्ये इलॉन मस्क यांचा देखील समावेश आहे. मोदी ज्या लोकांना भेटणार आहेत यामध्ये  नोबेल पारितोषिक विजेते, अर्थशास्त्रज्ञ, कलाकार, शास्त्रज्ञ, विद्वान, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ यासह सुमारे 24 लोकांना भेटतील.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात सुमारे 24 लोकांना भेटणार आहेत. मात्र, या बैठकीचा अजेंडा काय असेल, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. इलॉन मस्क यांनी त्यांची टेस्ला कार भारतात आणण्याचे संकेत दिले आहेत. मात्र अद्यापही याबाबत अधीकृत माहिती देण्यात आली नाही.

भारताने गेल्यावर्षी कारवरील आयात कर कमी करण्याच्या टेस्लाच्या विनंतीला मान्यता देण्यास नकार दिला होता. टेस्लाने स्थानिक पातळीवर वाहने तयार करावीत अशी भारताची इच्छा आहे, परंतु टेस्लाला आधी कार आयात करायची आहे आणि भारतीय बाजारपेठेत त्याची चाचणी करायची आहे.

यांची भेट घेणार नरेंद्र मोदी -

पंतप्रधान नरेंद्र मोदी टेस्लाचे सह-संस्थापक एलोन मस्क, खगोल भौतिकशास्त्रज्ञ नील डिग्रासे टायसन, ग्रॅमी पुरस्कार विजेते भारतीय-अमेरिकन गायक फालू (फाल्गुनी शाह), पॉल रोमर, निकोलस नसीम तालेब, रे डालियो, जेफ स्मिथ, मायकेल फ्रॉमन डॅनियल रसेल, एल्ब्रिज कोल्बी , डॉ पीटर आग्रे, डॉ स्टीफन क्लास्को आणि चंद्रिका टंडन, यांची भेट घेणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT