pm narendra modi express condolences to families pakistan flood the affected people  
ग्लोबल

पाकमधील पुराच्या हाहाकारावर PM मोदींनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

PM Modi On Pakistan Floods : सध्या पाकिस्तानात पुरामुळे हाहाकार माजला असून देशात आतापर्यंत 1100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुराच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, पाकिस्तानात आलेल्या पुरामुळे झालेला विध्वंस पाहून दुःख झाले. या नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना, जखमींना आणि या नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या सर्वांप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत होण्याची आशा करतो.

पाकिस्तानमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मृतांची संख्या सोमवारी 1,136 वर पोहोचली आहे. यासोबतच लोक आर्थिक संकटाचा सामना देखील करत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सरकारच्या आवाहनानंतर आंतरराष्ट्रीय स्थरातून पाकिस्तानला मदत मिळत आहे. 33 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे एक-सातमांश लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सोमवारी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, पुरामुळे पाकिस्तानात 1634 लोक जखमी झाले आहेत. तसेच प्राधिकरणाने म्हटले आहे की सुमारे 9,92,871 घरांचे पूर्ण किंवा अंशतः नुकसान झाले आहे, लाखो लोक अन्न आणि शुद्ध पिण्याचे पाणी इत्यादीपासून वंचित आहेत. यासह सुमारे 7 लाख 35 हजार 375 लाख जनावरेही बेपत्ता असून, संततधार पावसामुळे लाखो एकर सुपीक जमीन पाण्याखाली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT